no images were found
श्री करवीर निवासिनी अंबाबाई (महालक्ष्मी ) हक्कदार श्रीपूजक मंडळ व समिधा प्रतिष्ठान यांचे मार्फत महापालिकेच्या शाळांना दफ्तर व शैक्षणिक साहित्य प्रदान
कोल्हापूर : श्री करवीर निवासिनी अंबाबाई (महालक्ष्मी ) हक्कदार श्रीपूजक मंडळ व समिधा प्रतिष्ठान मार्फत दरवर्षी महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्य दिले जाते. या उपक्रमांतर्गत आज महापालिकेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, श्री करवीर निवासिनी अंबाबाई (महालक्ष्मी ) हक्कदार पुजक मंडळ चे सचिव माधव मुनिश्वर व समिधा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजित ठाणेकर यांच्या हस्ते दफ्तर व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्नेहलता बर्गे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक मीनाक्षी चौगुले यांनी मानले.
यामध्ये महापालिकेच्या शेठ रुईया विद्यालय, कोटीतीर्थ विद्यामंदिर, शिवाजी विद्यालय उद्यमनगर, सावित्रीबाई फुले विद्यालय, द्वारकानाथ कपूर विद्यालय शाळा गंजीमाळ या शाळेतील इयत्ता १ ली ते ४ थी च्या १६८ व इयत्ता ५ वी ते ७ वी च्या ८३ अशा एकूण २५१ विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन चंद्रकांत पाटील यांनी केले.
सदर वाटपाचा कार्यक्रम गंजीमाळ येथील द्वारकानाथ कपूर विद्यालयात करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी जयश्री जाधव, समिधा प्रतिष्ठान सचिव ओंकार गोसावी, श्रीपूजक स्वानंद मुनिश्वर, शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी, शारीरिक शिक्षण निरीक्षक सचिन पांडव, माजी विद्यार्थी युवराज खाडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पूनम कांबळे, ऋतुराज नढाळे, शांताराम सुतार आदी उपस्थित होते.