Home Uncategorized भारतात एआय डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅटफॉर्म उभारण्यासाठी अदाणी एंटरप्रायझेस आणि जॅबिलची धोरणात्मक भागीदारी

भारतात एआय डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅटफॉर्म उभारण्यासाठी अदाणी एंटरप्रायझेस आणि जॅबिलची धोरणात्मक भागीदारी

10 second read
0
0
11

no images were found

भारतात एआय डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅटफॉर्म उभारण्यासाठी अदाणी एंटरप्रायझेस आणि जॅबिलची धोरणात्मक भागीदारी

अहमदाबाद, :— भारतातील अग्रगण्य एकात्मिक पायाभूत सुविधा आणि हरित ऊर्जा समूह असलेल्या अदाणी समूहाने आणि अभियांत्रिकी, पुरवठा साखळी तसेच उत्पादन उपाययोजनांमध्ये जागतिक स्तरावरील अग्रणी कंपनी जॅबिल आयएनसी(NYSE: JBL) यांनी भारतात जागतिक दर्जाचे, उभ्या एकात्मिक (Vertically Integrated) एआय आणि डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चर उत्पादन व्यासपीठ उभारण्यासाठी धोरणात्मक भागीदारी करण्याचा मानस आज जाहीर केला.

       या भागीदारीद्वारे जॅबिलच्या सहा दशकांच्या प्रगत अभियांत्रिकी कौशल्य, विविध उद्योगांमधील उत्पादन तज्ज्ञता आणि सिद्ध हायपरस्केल डेटा सेंटर सोल्यूशन्स यांची सांगड अदाणी समूहाच्या व्यापक पायाभूत सुविधा, हरित ऊर्जा पोर्टफोलिओ, लॉजिस्टिक्स नेटवर्क आणि झपाट्याने वाढणाऱ्या देशांतर्गत डेटा सेंटर व्यवसायाशी घालण्यात येणार आहे. ही प्रभावी भागीदारी स्थानिक आणि जागतिक स्तरावर एआय-सक्षम डेटा सेंटर हार्डवेअरच्या वाढत्या मागणीची थेट पूर्तता करण्यासाठी रचली जाणार आहे.

     भारताचा डेटा सेंटर बाजार सध्या निर्णायक टप्प्यावर असून, वाढती एआय मागणी, क्लाऊड विस्तार आणि डेटा लोकलायझेशनच्या आवश्यकतांमुळे २०३० पर्यंत देशाची डेटा सेंटर क्षमता ५ ते ८ गिगावॅटपर्यंत पोहोचेल, असा उद्योग क्षेत्राचा अंदाज आहे. जागतिक हायपरस्केल कंपन्या भारतातील डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढवत असून, डेटा सेंटर, क्लाऊड आणि एआय परिसंस्थांमध्ये ५० अब्ज अमेरिकी डॉलर्सहून अधिक गुंतवणुकीची योजना आखण्यात आली आहे. डेटा सार्वभौमत्वावर भारताचा वाढता भर तंत्रज्ञान पुरवठा साखळ्यांमध्ये बदल घडवत आहे. डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन कायद्याच्या अंमलबजावणीसह या घडामोडींमुळे देशांतर्गत उत्पादित हार्डवेअरची मागणी वाढत असून भारताचे धोरणात्मक तंत्रज्ञान उत्पादन केंद्र म्हणून स्थान अधिक मजबूत होत आहे. याशिवाय, केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ मध्ये डेटा सेंटर उद्योगासाठी २०४७ पर्यंत जाहीर करण्यात आलेल्या ऐतिहासिक करसवलतीमुळे भारतातील उत्पादन उद्योगाच्या जागतिक निर्यात स्पर्धात्मकतेत लक्षणीय वाढ होणार आहे.ही भागीदारी ‘मेक इन इंडिया’ अभियानाच्या पुढील टप्प्याचे प्रतिनिधित्व करते. यामुळे भारत डिजिटल पायाभूत सुविधांचा आयातदार म्हणून नव्हे, तर एआय हार्डवेअरचा जागतिक उत्पादक आणि निर्यातदार म्हणून उदयास येण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहे.

    अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी म्हणाले, “जग अशा बुद्धिमत्ता क्रांतीमध्ये प्रवेश करत आहे, जी यापूर्वीच्या कोणत्याही औद्योगिक क्रांतीपेक्षा अधिक प्रभावशाली आहे. ऊर्जा आणि संगणकीय क्षमतेमधील समतोल साधणारे देश पुढील दशकाची दिशा ठरवतील. भारत या नेतृत्वासाठी अनोख्या स्थितीत आहे. जॅबिलसोबतची आमची भागीदारी भारतासाठी संपूर्ण एआय इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल आहे — हरित ऊर्जा निर्मितीपासून जागतिक दर्जाच्या हार्डवेअर उत्पादनापर्यंत. आम्ही भारताला एआय युगातील केवळ ग्राहक न ठेवता, बुद्धिमत्तेचा निर्माता, निर्माते आणि निर्यातदार बनवू.”

जॅबिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी माइक दस्तूर म्हणाले, “अदाणी समूहासोबतचे हे धोरणात्मक सहकार्य एआय परिसंस्थेतील ग्राहकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करण्याच्या आमच्या प्रयत्नांमधील आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. जॅबिलच्या साठ वर्षांहून अधिक अभियांत्रिकी अनुभव आणि प्रगत उत्पादन क्षमतांची जोड अदाणीच्या मजबूत पायाभूत सुविधा आणि ऊर्जा प्लॅटफॉर्मशी मिळाल्याने भारतातील आणि जगभरातील हायपरस्केल कंपन्या व उद्योगांसाठी रॅक स्तरापर्यंतच्या उपाययोजना साकार करता येतील. भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या एआय बाजारपेठांपैकी एक बनत असताना, येथील कुशल मनुष्यबळ आणि अनुकूल व्यावसायिक वातावरण या सहकार्यासाठी भारताला आकर्षक गंतव्य बनवते.”

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

दिव्यांग शाळांमध्ये पहिला दिवस उत्साहात साजरा विद्यार्थ्यांना भोजन आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप

दिव्यांग शाळांमध्ये पहिला दिवस उत्साहात साजरा विद्यार्थ्यांना भोजन आणि शैक्षणिक साहित्याचे…