no images were found
राज्य सरकारने अत्यंत जबाबदारीने ही योजना तयार केली आहे. सार्वजनिक निधीचा योग्य वापर व्हावा आणि कर्जमाफीचा लाभ खऱ्या अर्थाने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनाच मिळावा, यासाठी काही निकष ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे योजनेची परिणामकारकता वाढणार असून, निधीचा अपव्यय टाळण्यास मदत होईल, असे पाटील म्हणाले.
विरोधकांनी योजनेतील अटींचा आधार घेत सरकारवर टीका करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या हितासाठी विधायक सूचना द्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. राज्य सरकारने कर्जमाफीबरोबरच सिंचन, पीकविमा, कृषी पायाभूत सुविधा आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. शेतकरी कल्याण आणि कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी सरकार कटिबद्ध असून, या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना होणार असल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.