Home सामाजिक इंडोनेशियामध्ये शक्तीशाली भूकंप, ५० ठार, ७०० हून अधिक जखमी

इंडोनेशियामध्ये शक्तीशाली भूकंप, ५० ठार, ७०० हून अधिक जखमी

0 second read
0
0
106

no images were found

इंडोनेशियामध्ये शक्तीशाली भूकंप, ५० ठार, ७०० हून अधिक जखमी

जकार्ता : इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे सोमवारी ५.६ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपात ५० जणांचा मृत्यू झाला असून ७०० जण जखमी आहेत. या भूकंपात घरांची पडझड झाल्याची माहिती हवामानशास्त्र आणि भूभौतिकी संस्थेने सांगितले. भूकंपाचा केंद्रबिंदू पश्चिम जावाच्या सियांजूरमध्ये १० किमी खोलीवर होता. मात्र, यामुळे सुनामी येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली नाही.
जकार्तामध्ये भूकंपानंतर लोक घाबरले. त्यांच्या कार्यालयात काम करणारे लोकही बाहेर पडले. भूकंपाच्या धक्क्यांमुळे इमारत हादरत असल्याचे दिसून आले. यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. याआधी शुक्रवारी रात्री पश्चिम इंडोनेशियामध्ये भूकंपाचा जोरदार धक्का बसला होता. या काळात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही, यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने भूकंपाची तीव्रता ६.९ इतकी नोंदवली होती. त्याचा केंद्रबिंदू दक्षिण बेंगकुलूपासून २०२ किमी नैऋत्येस २५ किमी खोलीवर होता. यानंतर दुसरा धक्का बसला, ज्याची तीव्रता ५.४ होती.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

घराला पूर्णत्व देणाऱ्या बाईची हृदयस्पर्शी कथा ‘बाई तुझा आशीर्वाद’

घराला पूर्णत्व देणाऱ्या बाईची हृदयस्पर्शी कथा ‘बाई तुझा आशीर्वाद’ मराठी मालिका विश्वात नेह…