Home मनोरंजन कलाकारांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सजग जीवनशैली आणि दैनंदिन शाश्वततेचा संदेश दिला

कलाकारांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सजग जीवनशैली आणि दैनंदिन शाश्वततेचा संदेश दिला

2 min read
0
0
16

no images were found

कलाकारांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सजग जीवनशैली आणि दैनंदिन शाश्वततेचा संदेश दिला

 मुंबई,: जागतिक पर्यावरण दिन आपल्याला दररोजच्या छोट्या पण महत्त्वाच्या सवयींमधून पृथ्वीची काळजी घेण्याची आठवण करून देतो. कचरा कमी करणे, संसाधनांची बचत करणे किंवा आपल्या दैनंदिन सवयींबाबत सजग राहणे अशा सामूहिक प्रयत्नांमुळे दीर्घकाळ टिकणारा बदल घडू शकतो. यंदा सोनी सबचे कलाकार इकबाल खानकरुणा पांडे आणि विवाना सिंग यांनी निसर्गाशी असलेले त्यांचे वैयक्तिक नाते सांगितले आणि आरोग्यदायी पर्यावरणासाठी ते आपल्या दैनंदिन जीवनात कोणत्या सजग सवयी पाळतात हे शेअर केले.

     इकबाल खानजो यादें मालिकेत डॉदेव मेहता यांची भूमिका साकारतोम्हणाला, “मी बोर्डिंग स्कूलमध्ये शिकलोत्यामुळे संसाधनांचा अपव्यय  करण्याची शिस्त आम्हाला लहानपणापासून शिकवली गेलीपाणी किंवा वीज वाया घालवू नयेगरज नसताना दिवे आणि पंखे बंद करावेत हे खूप गंभीरपणे घेतले जायचेआजही या सवयी माझ्यात इतक्या घट्ट रुजल्या आहेत की माझं कुटुंब कधी कधी माझ्या काटेकोरपणावर मजा करतेपण खरं सांगायचं तरया छोट्या सवयी खूप महत्त्वाच्या आहेत आणि आपण सगळे थोडं सजग झालो तर खूप मोठा फरक पडू शकतो.”

    करुणा पांडेजी पुष्पा इम्पॉसिबल मध्ये पुष्पाची भूमिका करतेम्हणाली, “निसर्गात एक वेगळी शांतता आणि स्थिरता असतेजी गडबडीतल्या शहरी जीवनातही आपल्याला स्थिर ठेवतेमी गेल्या काही वर्षांत एक सवय लावली आहे – माझी स्वतःची पाण्याची बाटली आणि कापडी पिशवी नेहमी सोबत ठेवतेजेणेकरून सिंगलयूज प्लास्टिकवर अवलंबून राहावं लागू नयेही खूप छोटी गोष्ट आहेपण रोज रोज ती करत राहिल्यावर ती आपोआप सवय बनतेमी घरातही शक्य तितक्या वस्तू पुन्हा वापरण्याचा किंवा वेगळ्या प्रकारे उपयोग करण्याचा प्रयत्न करतेकारण मला खरंच वाटतं की शाश्वततेची सुरुवात दैनंदिन छोट्या सवयींपासूनच होते.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

यादें मालिकेतील कलाकार सांगतात सायकलिंग त्यांना कसे ठेवते ताजेतवाने आणि सक्रिय

यादें मालिकेतील कलाकार सांगतात सायकलिंग त्यांना कसे ठेवते ताजेतवाने आणि सक्रिय बालपणीच्या …