no images were found
चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमधून 70 कर्मचाऱ्यांची मुकादमपदी पदोन्नती
सेवानिवृत्त झालेल्या 29 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार
कोल्हापूर, : महानगरपालिकेतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमधून विविध विभागातील 70 कर्मचाऱ्यांना आज मुकादम पदावर पदोन्नती देण्यात आली. महापालिकेच्या विविध विभागातील वर्ग – 4 मधील कर्मचाऱ्यांना मुकादम पदासाठी पदोन्नती देण्याचे आदेश आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी काढले. शिपाई, पवडी कामागर, झाडू कामगार, सफाई कामगार व पहारेकरी या संवर्गातुन या पदोन्नत्या करण्यात आल्या. यातील सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती आदेश स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, सभागृह नेता मुरलीधर जाधव, उप-आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी कर्मचारी संघाचे मुख्य संघटक संजय भोसले, अध्यक्ष दिनकर आवळे व कर्मचारी उपस्थित होते.
आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दोन दिवसांपूर्वीच कामगार अधिकाऱ्यांना संबंधित प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज या पदोन्नत्या मंजूर करून कर्मचाऱ्यांना पदोन्नती आदेश देण्यात आले.
सदर नियुक्ती प्रक्रियेसाठी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, सहायक आयुक्त संजय सरनाईक, कामगार अधिकारी राम काटकर व रवका अधिकारी प्रशांत पंडत यांनी आवश्यक पडताळणीची कार्यवाही पूर्ण केली.
त्याचप्रमाणे महापालिकेच्या सेवेतून आज विविध विभागातील सेवानिवृत्त झालेल्या 29 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा महापालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात सत्कार करण्यात आला. हा सत्कार स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, सभागृह नेता मुरलीधर जाधव, उप-आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, संघाचे मुख्य संघटक संजय भोसले, अध्यक्ष दिनकर आवळे यांच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र तसेच प्रा.फंड रक्कमेचा चेक प्रदान करण्यात आला.