Home गौरव सन्मान डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

32 second read
0
0
6

no images were found

डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

 :‘इंडिया एलिट एज्युकेशन अवॉर्ड’ ने सन्मानित

कोल्हापूर (प्रतिनिधी ):डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला आहे. बेंगळुरू येथे झालेल्या इंडिया एलीट एजुकेशन अवार्ड सोहळ्यात ‘वर्षातील उत्कृष्ट आणि विश्वसनीय अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय’ म्हणून महाविद्यालयाला सन्मानित करण्यात आले. विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी या पुरस्काराबद्दल सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन करत महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचे हे फलित असल्याचे सांगितले. 

       संस्थेची गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रणाली, उत्कृष्ट प्रशासन, दर्जेदार प्लेसमेंट आणि आधुनिक पायाभूत सुविधा या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन  पुरस्कार देण्यात आला आहे. महाविद्यालयात झालेल्या विशेष समारंभात विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी या पुरस्काराबद्दल आतिशय आनंद व्यक्त करताना सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी  कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, महाविद्यालयाचे  संचालक डॉ. सतीश पावसकर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. एस. बी. पाटील, डीन अकॅडेमिक्स प्रा. राजेंद्र एस. पवार, आयक्यूएसी समन्वयक केदार के. सहस्रबुद्धे, असिस्टट रजिस्ट्रार  जे. ए. पवार आदी उपस्थित होते. 

        यावेळी ऋतुराज पाटील म्हणाले,  हा पुरस्कार म्हणजे डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या अविरत परिश्रमांचे आणि शैक्षणिक गुणवत्तेचे फलित आहे. आम्ही केवळ पदवीधर घडवत नसून, उद्योगांच्या गरजा ओळखून जागतिक गरजा ओळखून सक्षम मनुष्यबळ निर्माण करत आहोत. भविष्यातही विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षण आणि सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्था कटिबद्ध राहील.

        कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले, राष्ट्रीय स्तरावरील हा सन्मान संपूर्ण टीमच्या सांघिक प्रयत्नांमुळे शक्य झाला आहे. व्यवस्थापन, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळेच आज संस्थेने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

        संचालक डॉ. सतीश पावसकर म्हणाले, महाविद्यालयात संशोधन, उद्योग-संस्था सहकार्य आणि विद्यार्थीकेंद्री उपक्रमांना नेहमीच प्राधान्य दिले जाते. हा पुरस्कार आम्हाला शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन प्रयोग करण्याची आणि यशाची नवी शिखरे सर करण्याची ऊर्जा देईल.

      पुरस्कारासाठी आयक्यूएसी (IQAC) समन्वयक श्री. केदार के. सहस्रबुद्धे यांचे विशेष योगदान लाभले. संस्थेचे  अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील यांनी या पुरस्काराबद्दल  सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांचे अभिनंदन केले. 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In गौरव सन्मान
Comments are closed.

Check Also

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमधून 70 कर्मचाऱ्यांची मुकादमपदी पदोन्नती

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमधून 70 कर्मचाऱ्यांची मुकादमपदी पदोन्नती …