Home Uncategorized तांबट कमान ते तलवार चौक परिसरात महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई

तांबट कमान ते तलवार चौक परिसरात महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई

30 second read
0
0
9

no images were found

तांबट कमान ते तलवार चौक परिसरात महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई

6 डिजीटल बोर्ड, 9 हातगाड्या व 3 केबीन जप्त

कोल्हापूर : शहरातील अतिक्रमणांविरोधात महानगरपालिकेने आज पुन्हा कडक कारवाई करत तांबट कमान ते तलवार चौक परिसरातील अनधिकृत फेरीवाले, डिजिटल बोर्ड व केबिन हटविले. विभागीय कार्यालय क्र. 1 (गांधी मैदान) व अतिक्रमण निर्मूलन पथकाने या मोहिमेत 6 अनधिकृत डिजिटल बोर्ड, 9 हातगाड्या आणि 3 केबिन जप्त करण्यात आले. तर 24 हातगाडीधारकांनी स्वतःहून आपले अतिक्रमण काढून घेतले. महानगरपालिकेच्या ठराव क्र. 83, दि. 18 मे 2026 नुसार अतिक्रमण कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेले अनधिकृत साहित्य संबंधित व्यवसायधारकांना परत न देण्याचा निर्णय घेण्यात आला असून आज जप्त करण्यात आलेले साहित्य कायमस्वरूपी जप्त करण्यात आले आहे.

            ही कारवाई महापौर रुपाराणी निकम व आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त उज्वला शिंदे आणि शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. या कारवाईमध्ये उपशहर अभियंता महादेव फुलारी, कनिष्ठ अभियंता अनिरुद्ध कोरडे, चेतन आरमाळ, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपीक सजन नागलोत तसेच अतिक्रमण विभाग व विभागीय कार्यालय क्र. 1 मधील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

            महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील अनधिकृत फेरीवाले, व्यवसायधारक तसेच रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत शेड्स व अतिक्रमणांविरोधातील कारवाई यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार आहे. तरी संबंधितांनी आपले अतिक्रमण त्वरित स्वतःहून हटवावे, अन्यथा जप्त करण्यात आलेले साहित्य परत दिले जाणार नाही, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

डीवायपी पॉलिटेक्निकच्या योगेश घुलेची ‘गुगल स्टुडन्ट अँबेसिडर ‘ म्हणून निवड

 डीवायपी पॉलिटेक्निकच्या योगेश घुलेची ‘गुगल स्टुडन्ट अँबेसिडर ‘ म्हणून नि…