Home Uncategorized NEET पेपरफुटीप्रकरणी ‘कॉर्पोरेट आणि इंटिग्रेटेड’ पॅटर्नवर त्वरित बंदी घाला-हेमंत पाटील 

NEET पेपरफुटीप्रकरणी ‘कॉर्पोरेट आणि इंटिग्रेटेड’ पॅटर्नवर त्वरित बंदी घाला-हेमंत पाटील 

8 second read
0
0
9

no images were found

NEET पेपरफुटीप्रकरणी ‘कॉर्पोरेट आणि इंटिग्रेटेड’ पॅटर्नवर त्वरित बंदी घाला-हेमंत पाटील 

कडक कायद्यांची अंमलबजावणी करण्याची मागणी
पुणे, : लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला लावणाऱ्या ‘नीट’ (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. या प्रकरणाच्या सीबीआय तपासातून रोज धक्कादायक खुलासे समोर येत असून, या संपूर्ण गैरप्रकारामागे ‘कॉर्पोरेट क्लासेस’ आणि ‘इंटिग्रेटेड कॉलेजेस’चे मोठे रॅकेट सक्रिय असावे, असा संशय ‘भारत अगेन्स्ट करप्शन’चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी व्यक्त केला. शिक्षण व्यवस्थेला लागलेली पेपरफुटीची कीड मुळापासून उपटून टाकण्यासाठी सरकारने या पॅटर्नवर तात्काळ बंदी आणावी, अशी आक्रमक मागणी पाटील यांनी बुधवारी केली.

सीबीआयने आतापर्यंत देशभरात ४९ ठिकाणी छापे टाकून लॅपटॉप, मोबाईल आणि अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर येथून तब्बल १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. परीक्षेपूर्वीच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या तिन्ही मुख्य विषयांच्या प्रश्नपत्रिका लीक झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यावर तीव्र चिंता व्यक्त करताना हेमंत पाटील म्हणाले, “हा केवळ पेपरफुटीचा गुन्हा नसून प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी केलेला खेळ आहे.”

        “आजकाल शाळा आणि महाविद्यालयांना थेट कोचिंग क्लासेस जोडून ‘इंटिग्रेटेड कॉलेज’ संस्कृती फोफावली आहे. याच कॉर्पोरेट आणि इंटिग्रेटेड क्लासेसमुळे पेपरफुटीचे आणि भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढत आहे. जे शिक्षक नामांकित शाळा-कॉलेजांमध्ये सरकारी किंवा संस्थात्मक मानधनावर शिकवतात, त्यांना खासगी कोचिंग क्लासेसमध्ये शिकवण्यास पूर्णपणे बंदी घातली पाहिजे,” अशी आग्रही मागणी पाटील यांनी केली.

       या शिक्षण सम्राटांच्या रॅकेटवर आणि कटकारस्थानावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने आता केवळ चौकशीचा फार्स न करता, अत्यंत कडक कायद्यांची आणि नियमांची अंमलबजावणी करावी. सीबीआयचा तपास सुरू असला तरी मूळ व्यवस्थेतील त्रुटी दूर करणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन हेमंत पाटील यांनी केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

मराठी झी ५ वर 29 मे रोजी ‘सुपर डुपर’ या खुसखुशीत मराठी विनोदी चित्रपटाचा डिजिटल प्रीमियर 

मराठी झी ५ वर 29 मे रोजी ‘सुपर डुपर’ या खुसखुशीत मराठी विन…