Home Uncategorized विभागीय कार्यालय स्तरावर अभ्यांगत दिनास आठवडयातून एक दिवशी मी स्वतः उपस्थित राहणार – आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड

विभागीय कार्यालय स्तरावर अभ्यांगत दिनास आठवडयातून एक दिवशी मी स्वतः उपस्थित राहणार – आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड

50 second read
0
0
6

no images were found

विभागीय कार्यालय स्तरावर अभ्यांगत दिनास आठवडयातून एक दिवशी मी स्वतः उपस्थित राहणार – आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड

कोल्हापूर,  : महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय स्तरावर आठवड्यातून एक दिवस ‘अभ्यांगत दिनास’ मी स्वतः उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी व समस्या जाणून घेणार अशा सूचना आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिल्या.  महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

            या बैठकीत आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी शहरातील विकासकामे, स्वच्छता, महसूल वसुली, अतिक्रमण निर्मूलन, मालमत्ता व्यवस्थापन तसेच प्रलंबित कामांच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रभागनिहाय शौचालये, रस्ते, गटारी, ड्रेनेज व स्वच्छतागृह दुरुस्तीच्या कामांची यादी तयार करून त्याचा प्राधान्यक्रम निश्चित करण्याच्या सूचना दिल्या.  वर्कशॉप, परिवहन विभाग व इतर सर्व विभागांनी स्क्रॅप साहित्याची यादी तयार करावी तसेच कार्यशाळा अधीक्षकांनी नियंत्रण ठेवून स्क्रॅप साहित्याचा लिलाव पारदर्शक पद्धतीने पूर्ण करावा असे आदेश देण्यात आले. महापालिकेच्या स्क्रॅप लिलावाबाबत व्यापक प्रसिद्धी करण्यावरही भर देण्यात आला.

            एमआरडीपी अंतर्गत बुद्धगार्डन यंत्रशाळेतील रिटेनिंग वॉलचे काम तातडीने पूर्ण करणे, हॉकी स्टेडियम येथील गाळे भाडेपट्ट्याने देण्यासाठी निविदा प्रसिद्ध करणे तसेच महापालिकेच्या गाळे, खुल्या जागा व हॉल यांची विभागीय कार्यालयनिहाय माहिती तयार करून रेकॉर्ड हस्तांतरित करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. शहरातील मोठी उद्याने खाजगी तत्वावर विकसित करण्यासाठी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट मागविण्याचे आदेशही देण्यात आले. शहरातील  नाल्यांच्या सफाईची कामे मे २०२६ अखेरपर्यंत पूर्ण करणे तसेच मुख्य इमारतीतील रेकॉर्ड विभाग स्थलांतरासाठी पर्यायी जागा शोधण्याच्या कामास गती दयावी. अधिकृत फेरीवाल्यांना ओळखपत्र स्वरूपात स्टीकर देण्याचे आदेशही या बैठकीत देण्यात आले.

            यावेळी अतिरिक्त रविकांत आडसूळ, उप-आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त जयंत जावडेकर, उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, डॉ.विजय पाटील, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, लेखा व वित्त अधिकारी राजश्री पाटील, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, नगरसचिव सुनील बिद्री, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, उपशहर अभियंता सुरेश पाटील, निवास पोवार, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, कामगार अधिकारी राम काटकर, रवका अधिकारी प्रशांत पंडत, विधी अधिकारी संदीप तायडे, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंह रजपूत, इस्टेट ऑफिसर शेखर साळोखे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, कनिष्ठ अभियंता अनिरुध्द कोरडे उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

डॉ.के.आर.यादव यांच्या निधनामुळे बहुआयामी व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड – कुलगुरू डॉ.राजनीश कामत

डॉ.के.आर.यादव यांच्या निधनामुळे बहुआयामी व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड – कुलगुरू डॉ.…