Home Uncategorized स्वच्छतेच्या कामाचा आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडून आढावा

स्वच्छतेच्या कामाचा आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडून आढावा

26 second read
0
0
10

no images were found

स्वच्छतेच्या कामाचा आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडून आढावा

कोल्हापूर,  : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या स्वच्छता कामकाजाबाबत आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी आज दुपारी आढावा घेतली. शहरातील स्वच्छता, कचरा उठाव आणि क्यूआर कोड स्कॅनिंगच्या कामाचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला.

            आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी बैठकीत टिप्परद्वारे कचरा उठाव केल्यानंतर करण्यात येणारे क्यूआर कोड स्कॅनिंग, हॉटेल व हॉकर्सकडून कचरा उठावानंतर आकारण्यात येणारे सेवा शुल्क तसेच दैनंदिन स्वच्छतेच्या कामांची माहिती घेतली. काही आरोग्य निरीक्षकांनी क्यूआर कोड स्कॅनिंग कमी होण्यामागे तांत्रिक अडचणी असल्याचे सांगितले. यावर आयुक्तांनी तांत्रिक अडचणी आहेत की संबंधितांकडून हलगर्जीपणा होत आहे, याची पडताळणी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य आरोग्य निरीक्षकांना दिले. तसेच चांगले काम करणाऱ्या आरोग्य निरीक्षकांना प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात यावा, तर कामात निष्काळजीपणा करणाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश उपआयुक्त परितोष कंकाळ यांना देण्यात आले. पुढील बैठकीत आरोग्य निरीक्षकांनी दैनंदिन केलेल्या कामाचे पीपीटीद्वारे सादरीकरण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. तसेच शहरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी माजी सैनिकांची विशेष पथके तयार करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले.

            या बैठकीस उपआयुक्त परितोष कंकाळ, सहायक आयुक्त स्वाती दुधाणे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, शहर समन्वयक व सर्व आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

राज्यपालांकडून अधिकारी, कर्मचारी यांना दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा

राज्यपालांकडून अधिकारी, कर्मचारी यांना दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा मुंबई,  : राज्यप…