Home Uncategorized राज्यपालांकडून अधिकारी, कर्मचारी यांना दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा

राज्यपालांकडून अधिकारी, कर्मचारी यांना दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा

8 second read
0
0
6

no images were found

राज्यपालांकडून अधिकारी, कर्मचारी यांना दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा

मुंबई,  : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी दहशतवाद विरोधी दिनानिमित्त लोकभवनातील अधिकारी व कर्मचारी यांना दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा दिली. 

     अहिंसा व सहिष्णुतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा सर्वशक्तीनिशी मुकाबला करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची स्मृतिदिन दहशतवाद विरोधी दिवस म्हणून पाळण्यात येतो.  

      राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, सहसचिव एस राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे यांसह लोकभवनातील कर्मचारी व अधिकारी तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार यावेळी उपस्थित होते. 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

स्वच्छतेच्या कामाचा आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडून आढावा

स्वच्छतेच्या कामाचा आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडून आढावा कोल्हापूर,  : मह…