Home निवड शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. राजनीश कामत

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. राजनीश कामत

0 second read
0
0
51

no images were found

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. राजनीश कामत

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी प्रा. डॉ. राजनीश कमलाकर कामत यांची निवड आज जाहीर करण्यात आली. महाराष्ट्राचे राज्यपाल तथा शिवाजी विद्यापीठाचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी आज ही घोषणा केली. आदेशाची प्रत आज सायंकाळी विद्यापीठ कार्यालयास प्राप्त झाली.
डॉ. राजनीश कामत हे शिवाजी विद्यापीठाचे १४ वे कुलगुरु ठरले आहेत. डॉ. दिगंबर शिर्के यांच्यानंतर सलग दुसऱ्यांदा शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापकाकडेच कुलगुरू पदाचा पदभार आलेला आहे. डॉ. कामत हे शिवाजी विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागाचे माजी प्रमुख असून विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे. सध्या ते मुंबई येथील डॉ. होमी भाभा समूह विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचाही अतिरिक्त कार्यभार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In निवड
Comments are closed.

Check Also

करवीर तालुक्यातील वडणगे मधील देवी पार्वती हायस्कूल मध्ये इंटरॅक्ट क्लबचा पदग्रहण समारंभ झाला उत्साहपूर्ण वातावरणात

करवीर तालुक्यातील वडणगे मधील देवी पार्वती हायस्कूल मध्ये इंटरॅक्ट क्लबचा पदग्रहण समारंभ झा…