Home राजकीय पी .एम . सुर्यघर योजना संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणाने राबवणार – मंत्री हसन मुश्रीफ

पी .एम . सुर्यघर योजना संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणाने राबवणार – मंत्री हसन मुश्रीफ

0 second read
0
0
9

no images were found

पी .एम . सुर्यघर योजना संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणाने राबवणार – मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर :  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृढ निश्चयातून साकारलेली पी. एम सुर्यघर योजना संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात प्रभावीपणाने राबवून पर्यावरण संरक्षण तसेच महागाईच्या कालखंडामध्ये ग्राहकांना शुन्य वीज बिल आणून दिलासा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आज मुश्रीफ यांनी कागल तालुक्यातील पाणंद रस्ते ,जयसिंगराव तलाव पाणीपुरवठा,महावितरण आदी प्रश्नांसह इतर विषयांचा आढावा त्यांनी घेतला .
ते म्हणाले ,या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी साठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने अल्प व्याजदरात घरगुती सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी इच्छुक नागरिकांना कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे.तसेच कागल तालुक्यातील 86 गावात किमान एक किलोमीटर पर्यंतचे पाणंद रस्ते संबंधित यंत्रणांनी लवकरात लवकर तयार करावेत यासाठी प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देण्यात आली असल्याचे सांगून कागल नगर परिषदेच्या मालकीचा असलेला जयसिंगराव तलावामध्ये पाणी पातळी कमी राहते .हा तलाव जलसंपदा विभागाने कायमस्वरूपी पूर्ण क्षमतेने भरून देण्याबाबत आपण लवकरच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत मंत्रालयामध्ये बैठक घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले

चौकट : कागलच्या पर्यटनक्षेत्रामध्ये भर टाकणारे आणि मिनी गोवा म्हणून ओळखले जाणाऱ्या या परिसरातील कारंजे , धबधबे , लाईट शो पाहण्यासाठी जिल्हाधिकारी श्री राठोड व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद डॉ.जॅस्मिन यांनी कागलचा लवकरात लवकर दौरा करावा असे निमंत्रणही त्यांनी या बैठकीत दिले .
या बैठकीसाठी जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, प्रांताधिकारी प्रसाद चौगुले ,उपजिल्हाधिकारी शक्ती कदम ,तहसीलदार अमरदीप वाकडे, नगरपालिका मुख्याधिकारी अजित पाटणकर , महावितरणचे कार्यकारी अभियंता एम एस मिसाळ ,प्रवीण काळभोर,मनोज फराकटे,युवराज पाटील यांच्यासह संबंधित उपस्थित होते .

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

धार येथील ‘भोजशाळा’ हे हिंदू मंदिरच; मंदिरमुक्तीच्या लढ्याला आणखी एक ऐतिहासिक यश !

धार येथील ‘भोजशाळा’ हे हिंदू मंदिरच; मंदिरमुक्तीच्या लढ्याला आणखी एक ऐतिहासिक …