no images were found
अर्जुन पुंज यांचे छोट्या पडद्यावर पुनरागमन
सोनी सबवरील यादें जी आपल्या भावनिक कथानकामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे, आता एका नव्या रंगतदार वळणासह सज्ज होत आहे. अभिनेता अर्जुन पुंज याच्या पुनरागमनामुळे मालिकेत एक वेगळीच उर्जा आणि नॉस्टॅल्जियाची लहर येणार आहे. तब्बल दहा वर्षांहून अधिक काळानंतर अर्जुन पुंज छोट्या पडद्यावर परतत असून, त्याच्या पुनरागमनाने चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अर्जुन पुंज मालिकेत ‘डिग्गी’ची भूमिका साकारणार आहे श्रीष्टी (गुलकी जोशी)चा प्रेमसाथी. ही व्यक्तिरेखा कथानकात एक वेगळीच ऊब आणि भावनिक खोली आणते. मनाने कलाकार असलेला डिग्गी छोट्या छोट्या क्षणांत सौंदर्य शोधतो आणि आयुष्याला नैसर्गिक, बिनधास्त पद्धतीने साजरे करतो. तो सहज, भावनाप्रधान आणि मनाने संवेदनशील आहे. नात्यांमध्ये तो प्रामाणिकपणे जगतो आणि मनापासून जोडतो. डॉ. देव, ही भूमिका इक्बाल खान यांनी साकारली गंभीर आणि शिस्तबद्ध व्यक्तिमत्त्वाच्या पूर्ण विरुद्ध, डिग्गीचा मुक्त आणि स्पॉन्टेनियस स्वभाव कथेला एक ताजेतवाने संतुलन देतो.
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अर्जुन पुंज म्हणाले, “इतक्या वर्षांनंतर पुन्हा टेलिव्हिजनवर परत येणं माझ्यासाठी खूपच रोमांचक आणि भावनिक आहे. ‘यादें’ आणि डिग्गी या व्यक्तिरेखेकडे मला आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे त्याचा खरा आणि बिनधास्त स्वभाव. तो सगळं काही बदलण्याचा किंवा पारंपरिक अर्थाने हिरो बनण्याचा प्रयत्न करत नाही; तो फक्त आपल्या प्रियजनांच्या सोबत उभा राहतो. त्याच्या व्यक्तिमत्त्वात एक प्रामाणिकपणा आणि ऊब आहे, जी मला खूपच ताजीतवानी वाटली. डिग्गी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, लोकांमध्ये आणि क्षणांमध्ये सौंदर्य पाहतो ही गोष्ट मला वैयक्तिकरित्या खूप जवळची वाटते. प्रेक्षकांना डिग्गीची ओळख करून देण्यासाठी आणि या सुंदर प्रवासाचा भाग होण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.”