Home Uncategorized डेल टेक्नॉलॉजीज ने भारतात एआय आधारित ‘ डेल १५ ‘ केला लाँच

डेल टेक्नॉलॉजीज ने भारतात एआय आधारित ‘ डेल १५ ‘ केला लाँच

15 second read
0
0
17

no images were found

डेल टेक्नॉलॉजीज ने भारतात एआय आधारित ‘ डेल १५ ‘ केला लाँच

कोल्हापूर ,( प्रतिनिधी ): डेल टेक्नॉलॉजीजने ज्यांना दिवसभरात अधिक गोष्टी साध्य करायच्या असतात, अशा ग्राहकांसाठी डिझाइन केलेला  डेल १५ आज भारतात लाँच केला आहे. इंटेल  कोअर अल्ट्रा २ सिरिज एच  प्रोसेसरवर आधारित असलेल्या या डिव्हाईसमध्ये अॅरो लेक आर्किटेक्चर आणि एडवांस्ड ऑन-डिव्हाइस एआयसाठी स्वतंत्र एनपीयू उपलब्ध आहे. डेल  १५  वापरकर्त्यांना अभ्यास, काम किंवा कुटुंब आणि मित्रांशी संपर्क साधताना अधिक स्मार्ट आणि सीमलेस मल्टीटास्किंगचा आनंद घेण्यास सक्षम करतो. यातील  विंडोज ११  मध्ये इंटेलिजंट असिस्टंससाठी समर्पित कोपायलट की,शांत आणि सुरळीत कामगिरीसाठी अ‍ॅडॉप्टिव्ह थर्मल टेक्नॉलॉजी आणि जलद चार्जिंगसाठी एक्सप्रेसचार्ज सारख्या वैशिष्ट्यांसह वापरकर्ते आपली कामे सहजपणे पूर्ण करू शकतात आणि दीर्घकाळ कनेक्टेड राहू शकतात. डेल १५ हा एकाच डिव्हाईसमध्ये विश्वासार्हता, नवनिर्मिती आणि शाश्वततेला एकत्र आणतो, ज्यामुळे लोकांना सर्वात महत्त्वाच्या गोष्टी प्राधान्याने पूर्ण करण्यास मदत होते. किंमत (करांसह): डेल  १५ ची सुरुवात रु. ६९,६९९ पासून होते.

     डेल १५ ची  आकर्षण ऑफर्स: निवडक बँकांच्या क्रेडिट कार्ड ईएमआयवर रु. ५००० पर्यंत कॅशबॅक., सर्व बँकांच्या क्रेडिट कार्ड्स आणि निवडक बँकांच्या डेबिट कार्ड्सवर ३, ६, ९ आणि १२ महिन्यांच्या ईएमआय प्लॅनसाठी नो कॉस्ट ईएमआय उपलब्ध आहे., रु. ९९ मध्ये १ वर्षाचे एडीपी आणि रु. २९९  मध्ये वॉरंटीत १ वर्षाची मुदतवाढ., झिरो डाऊन पेमेंट फायनान्सचे पर्याय उपलब्ध आहेत. आणि केवळ रु. ९९९ मध्ये एआय झोलो प्रो – १ वर्षाचे मल्टिमॉडेल सबस्क्रिप्शन. 

    उपलब्धता : नवीन डेल १५ डिव्हाईस हे डेल डॉट कॉम, डीईएस, मोठ्या रिटेल स्टोअर्स आणि मल्टि-ब्रँड आउटलेट्सवर खरेदीसाठी उपलब्ध असतील.

    लाँचबद्दल बोलताना डेल टेक्नॉलॉजीजच्या एपीजे कन्झ्युमर बिझनेसचे व्हाईस प्रेसिडेंट आणि जनरल मॅनेजर राजकुमार ऋषी म्हणाले, “तंत्रज्ञानाने व्यक्तींना अधिक साध्य करण्यासाठी सक्षम केले पाहिजे आणि नवीन डेल  १५ भारतात आमच्या ग्राहकांसाठी नेमके तेच करते असा आमचा विश्वास आहे. काम, शिक्षण आणि सर्जनशीलता वेगाने विकसित होत असताना, भारतीय वापरकर्त्यांना त्यांच्या बदलत्या गरजांनुसार डिव्हाईसची आवश्यकता असते. प्रत्येक डिझाइन आणि परफॉर्मन्सचा निर्णय अंतिम वापरकर्त्याला डोळ्यासमोर ठेवून घेण्यात आला आहे. डेल टेक्नॉलॉजीज सर्व मार्केट सेगमेंट्समध्ये आपला पोर्टफोलिओ विस्तारत असताना प्रत्येक किंमतीत सर्वोत्तम उत्पादने अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…