Home निवड प्रभाग समिती सभापतीपदी वैभव कुंभार, अनुराधा खेडकर, संजय मोहिते, विशाल चव्हाण यांची बिनविरोध निवड

प्रभाग समिती सभापतीपदी वैभव कुंभार, अनुराधा खेडकर, संजय मोहिते, विशाल चव्हाण यांची बिनविरोध निवड

45 second read
0
0
19

no images were found

प्रभाग समिती सभापतीपदी वैभव कुंभार, अनुराधा खेडकर, संजय मोहिते, विशाल चव्हाण यांची बिनविरोध निवड

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक 1 ते 4 च्या सभापतीपदी अनुक्रमे वैभव अविनाश कुंभारअनुराधा सचिन खेडकरसंजय मोहिते व विशाल शिवाजी चव्हाण यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.

            उपजिल्हाधिकारी संपत खिलारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत या निवडी जाहीर करण्यात आल्याप्रभाग समिती क्रमांक 1 गांधी मैदानक्रमांक 2 छत्रपती शिवाजी मार्केटक्रमांक 3 राजारामपुरी जगदाळे हॉल आणि क्रमांक 4 ताराराणी मार्केट या विभागीय कार्यालयांसाठी सभापती पदाकरिता प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला होता.

            बैठकीच्या प्रारंभी विभागीय कार्यालयनिहाय सभा अध्यक्षांनी अर्जांची छाननी करून सर्व अर्ज वैध असल्याचे घोषित केलेत्यानंतर माघारीसाठी 15 मिनिटांचा अवधी देण्यात आलामात्रएकमेव उमेदवारी अर्ज असल्याने सर्व चारही उमेदवारांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

          निवडीनंतर उपजिल्हाधिकारी संपत खिलारीमहापौर सौरुपाराणी निकमस्थायी समिती सभापती विशाल शिराळेमहिला व बालकल्याण समिती सभापती सौकौसर बागवानउपसभापती सौदिपा ठाणेकरगटनेते मुरलीधर जाधवविरोधी पक्षनेते राजेश लाटकरगटनेते शारंगधर देशमुखआदील फरासउपआयुक्त किरणकुमार धनवाडेनगरसचिव सुनिल बिद्रे तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविकांनी नवनिर्वाचित सभापतींचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In निवड
Comments are closed.

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…