Home स्पोर्ट्स पिक्सेल क्रेडिट कार्ड आणि स्पेंड अँड विन मोहिमेच्‍या माध्‍यमातून फुटबॉलप्रेमींना मिळणार अद्वितीय अनुभव घेण्याची संधी

पिक्सेल क्रेडिट कार्ड आणि स्पेंड अँड विन मोहिमेच्‍या माध्‍यमातून फुटबॉलप्रेमींना मिळणार अद्वितीय अनुभव घेण्याची संधी

1 min read
0
0
28

no images were found

 पिक्सेल क्रेडिट कार्ड आणि स्पेंड अँड विन मोहिमेच्‍या माध्‍यमातून फुटबॉलप्रेमींना मिळणार अद्वितीय अनुभव घेण्याची संधी

मुंबई, : डिजिटल पेमेंट क्षेत्रातील जागतिक आघाडीची कंपनी आणि फिफाची अधिकृत भागीदार व्हिसाने (एनवायएसई: व्‍ही) आज भारतातील आघाडीची खाजगी बँक एचडीएफसी बँकेसोबत फिफा वर्ल्ड कप २०२६™साठी कराराची घोषणा केली आहे. या भागीदारीचा भाग म्हणून, व्हिसा आणि एचडीएफसी बँकेने लिमिटेडएडिशन फिफा वर्ल्ड कप २०२६ व्हिसा पिक्सेल क्रेडिट कार्ड लाँच केले. यासोबत देशभरात एक विशेष स्पेंड अँड विन मोहीम देखील राबवण्यात येणार आहे, ज्यामुळे भारतातील ग्राहकांना जगातील या बहुप्रतिक्षित क्रीडा महोत्सवाचा जवळून अनुभव घेता येईल.

या उपक्रमाची घोषणा मुंबईत एका भव्य कार्यक्रमात करण्यात आली. यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध फुटबॉलपटू मायकेल ओवेन यांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली, ज्यामधून फिफा वर्ल्ड कप २०२६™ चा उत्साह आणि त्याचे जागतिक महत्त्व दिसून आले.

एचडीएफसी बँकेचे हे एकमेव लिमिटेड एडिशन फिफा वर्ल्ड कप २०२६ व्हिसा पिक्सेल क्रेडिट कार्ड प्रामुख्याने नवीन पिढीच्या डिजिटल ग्राहकांसाठी डिझाइन केलेले आहे. हे कार्ड पूर्णपणे अॅप-आधारित आणि डिजिटल असून यात त्वरित कार्ड मिळणे, स्थिर कस्टमायझेशन आणि सुलभ डिजिटल पेमेंटची सुविधा देण्‍यात आली आहे. ११ एप्रिलपासून हे फिफा-थीमवर आधारित कार्ड नवीन अर्जदारांसाठी तसेच एचडीएफसी बँक पिक्सेल प्लेच्या विद्यमान ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

एचडीएफसी बँकेच्या पेमेंट पोर्टफोलिओमध्ये फिफाचा सहभाग

या ऐतिहासिक भागीदारीमुळे आता एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि बिझनेस कार्ड्ससह सर्व प्रकारच्या कार्ड ग्राहकांना फिफा वर्ल्ड कप २०२६™ चा सामना प्रत्यक्ष मैदानावर जाऊन पाहण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

व्हिसाची फिफासोबत असलेली प्रदीर्घ जागतिक भागीदारी आणि व्हिसाचे सुरक्षित व सर्वमान्य पेमेंट नेटवर्क यांच्या बळावर हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमामुळे ग्राहकांचे दैनंदिन व्यवहार फुटबॉलच्या अविस्मरणीय अनुभवांत रूपांतरित होणार आहेत.

स्पेंड अँड विन’ मोहीमेसह फिफाची अविस्मरणीय बक्षिसे जिंकण्याची संधी

या भागीदारीचा मुख्य कणा म्हणजे एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, बिझनेस कार्ड आणि फॉरेक्स प्रीपेड कार्ड्सवर चालणारी विशेष स्पेंड अँड विन मोहीम. या अंतर्गत, पात्र ठरणाऱ्या व्यवहारांद्वारे ग्राहक अनेक प्रतिष्ठित बक्षिसे मिळवू शकतात, जसे फिफा वर्ल्ड कप २०२६™ मॅच पॅकेजेस, फिफा-थीमवर आधारित स्टेकेशन्स, अधिकृत फिफा मर्चेंडाईज, शॉपिंग व लाईफस्टाइल वाऊचर्स. ही मोहीम चाहत्यांना केवळ सामन्याच्या दिवसांपुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या फुटबॉलमधील आवडीला दैनंदिन खर्च आणि डिजिटल पेमेंटशी जोडते, ज्यामुळे स्पर्धेचा आनंद अधिक उत्‍साहित होतो.

श्री. आशिष पार्थसारथी, ग्रुप हेड – ब्रँच बँकिंग, पेमेंट्स, ट्रेझरी, लायबिलिटी प्रॉडक्ट्स, मार्केटिंग, व्हर्च्युअल चॅनेल आणि इन्फ्रास्ट्रक्चर म्‍हणाले, “भारतातील आघाडीचे क्रेडिट कार्ड जारीकर्ते म्हणून फिफा वर्ल्ड कपचा थरार आणि डिजिटल पेमेंटची सुलभ सोय कोट्यवधी ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिसासोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. या सहयोगातून आम्ही विशेष सुविधा आणि आमचे खास तयार केलेले लिमिटेड-एडिशन एचडीएफसी बँक पिक्सेल प्ले क्रेडिट कार्ड फुटबॉलप्रेमींच्‍या अनुभवात भर घालत आहोत. आमच्या कार्डधारकांना या स्पर्धेशी जोडले जाण्यासाठी, फुटबॉलची आवड साजरी करण्यासाठी आणि फिफा वर्ल्ड कप २०२६ दरम्यान अपवादात्मक मूल्य मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

या लाँचबाबत मत व्‍यक्त करत, ऋषी छाबरा, कंट्री मॅनेजर, व्हिसा इंडिया म्हणाले, “व्हिसाची फिफासोबत असलेल्या दीर्घकालीन जागतिक भागीदारीच्या माध्यमातून आम्ही फिफा वर्ल्ड कप २०२६™ चा उत्साह भारतातील फुटबॉलप्रेमींपर्यंत सर्वसमावेशक पद्धतीने पोहोचवण्यास उत्सुक आहोत. एचडीएफसी बँकेसोबतच्या आमच्या देशव्यापी सहकार्यामुळे सर्व प्रकारच्या कार्डांवरील दैनंदिन व्यवहारांचे रूपांतर एका विलक्षण जागतिक अनुभवाच्या संधीमध्ये झाले आहे. जगातील सर्वात मोठे क्रीडा क्षण भारतातील ग्राहकांसाठी अधिक सुलभ, सुरक्षित आणि फायदेशीर बनवणे, हाच आमचा उद्देश आहे.”

फिफा वर्ल्ड कपचा थरार स्टेडियमच्या पलीकडे पोहोचवणे

फिफा वर्ल्ड कप २०२६™ या स्पर्धेची आतापर्यंतची सर्वात मोठी आणि सर्वसमावेशक आवृत्ती ठरणार आहे, तसेच जागतिक स्तरावर सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक असेल, अशी अपेक्षा आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून, व्हिसा आणि एचडीएफसी बँक नाविन्यपूर्ण संकल्पना, ग्राहक सहभाग आणि क्रीडा-आधारित अनुभवांप्रती असलेली आपली कटिबद्धता अधिक दृढ करत आहेत. यामुळे जागतिक क्रीडा, डिजिटल पेमेंट आणि लाइफस्‍टाइल रिवॉर्ड्स यांच्या संगमावर त्यांचे नेतृत्व अधिक मजबूत होत आहे. व्हिसा आणि एचडीएफसी बँक मिळून भारतातील फुटबॉलप्रेमींचा फिफा वर्ल्ड कप २०२६™ चा अनुभव नव्याने परिभाषित करत आहेत, ज्यामुळे त्यांना हा खेळ, त्याचे यश आणि महत्त्वाचे क्षण अधिक जवळून अनुभवता येतील.

अर्ज कुठे करावा

विद्यमान पिक्सेल प्ले ग्राहक: पिक्सेल अॅपद्वारे (पेझॅप) अर्ज करू शकतात.

नवीन अर्जदार: पेझॅप डाउनलोड करून किंवा एचडीएफसी बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स
Comments are closed.

Check Also

उद्योगस्नेही धोरणामुळे ‘ग्लोबल इन्व्हेस्टमेंट हब’ म्हणून महाराष्ट्राची ओळख-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उद्योगस्नेही धोरणामुळे ‘ग्लोबल इन्व्हेस्टमेंट हब’ म्हणून महाराष्ट्राची ओळख-मुख्यमंत्री देव…