no images were found
मी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिकेत छोट्या सावित्रीच्या रुपात तक्षाला भरभरुन प्रेम
स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ अतिशय रंजक वळणावर पोहोचली आहे. मालिकेत लवकरच एका चिमुकल्या पाहुणीची एण्ट्री होणार आहे. प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करणारी बालकलाकार तक्षा शेट्टी मालिकेत ‘जुई’ या भूमिकेतून भेटीला येणार आहे. मी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिकेत सावित्रीबाईंचं बालपण साकारून तक्षाने आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता पुन्हा एकदा नव्या रुपात तक्षाला पहाता येणार आहे.
मालिकेत तक्षा साकारत असलेली जुई ही गरीब घरातील, पण अत्यंत चुणचुणीत आणि हुशार मुलगी आहे. जुईला तिच्या पालकांनी शिक्षणासाठी मुंबईत तिच्या मावशीकडे पाठवलं. मात्र मावशीने जुईला शाळेऐवजी सिग्नलवर गजरे, साबण यांसारख्या वस्तू विकायला लावलं. या परिस्थितीतही जुई तिच्या निरागस स्वभावाने आणि व्यवहारिक हुशारीने प्रत्येक प्रसंगाला सामोरी जाते. तिची खासियत म्हणजे तिची फोटोग्राफिक मेमरी, ती जे काही पाहते, ते अचूक लक्षात ठेवते. साधा कागद जरी मिळाला तरी त्याच्यापासून अनोख्या वस्तू करायची कला तिला अवगत आहे. अश्या या चुणचुणीत आणि गोड मुलीची भेट योगायोगाने नंदिनीशी होते. सध्या नंदिनीच्या आयुष्यात बरीच उलथापालथ घडतेय. अश्या परिस्थितीत जुईसोबतची भेट नंदिनीच्या आयुष्याला नेमकी कोणती दिशा देणार हे पहाणं उत्सुकतेचं असणार आहे. त्यासाठी न चुकता पाहा लग्नानंतर होईलच प्रेम सायंकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.