17 second read
0
0
24

no images were found

महापालिकेच्यावतीने शहरात रविवारी स्वच्छता मोहिम

कोल्हापूर, : महापालिकेच्यावतीने रविवार, दि.29 मार्च 2026 रोजी महापौर सौ.रुपाराणी निकम यांच्या निर्देशानुसार शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. हि स्वच्छता मोहिम सकाळी 7.30 वाजता राबविण्यात येणार आहे.

            हि स्वच्छता मोहिम सायबर चौक, आयएस ट्रेनिंग सेंटर, टाकाळा चौक ते शेंडा पार्क रोड, हॉकी स्टेडिअम चौक, व्हिनस कॉर्नर, जिल्हाधिकारी कार्यालय रोड, माऊली पुतळा, रेड्याची टक्कर चौक, खानविलक पेट्रोप पंप ते धैर्यप्रसाद चौक, व्हिनस कॉर्नर ते सीबीएस स्टँण्ड व पंचगंगा नदी घाट परिसरात घेण्यात येणार आहे.

            या स्वच्छता मोहिमेत महापालिकेचे सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर या स्वच्छता मोहिमेत जास्तीजास्त नागरीकांचा सहभागी करुन घेण्यात येणार आहे. यासाठी शहरातील सर्व सार्वजनिक संस्था, तरुण मंडळे, तालीम संघांनी मोठया संख्येसह सहभागी व्हावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

व्हेनेझुएलाच्या  कार्यवाहक राष्ट्राध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांनी केली टाटा मोटर्सच्या नवीन ईलेक्ट्रिक वाहनांची पाहणी

व्हेनेझुएलाच्या  कार्यवाहक राष्ट्राध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांनी केली टाटा मोटर्सच्य…