Home Uncategorized महापालिका व जलसंपदा वसूलीबाबत सकारात्मक तोडगा

महापालिका व जलसंपदा वसूलीबाबत सकारात्मक तोडगा

51 second read
0
0
26

no images were found

महापालिका व जलसंपदा वसूलीबाबत सकारात्मक तोडगा

कोल्हापूर, : कोल्हापूर महानगरपालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यातील थकबाकी व वसूलीबाबत अखेर सकारात्मक तोडगा काढण्यात आला. या संदर्भात महापौर सौ. रुपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली आज समन्वय बैठक महापौर कार्यालयात पार पडली.

            शुक्रवार, दि.२० मार्च रोजी जलसंपदा विभागाने शहराच्या पाणीपुरवठ्यासाठीचा पंप बंद करून सील केला होता. यावेळी महापालिकेने जलसंपदा विभागाच्या कार्यालयावर घरफाळा व पाणीपट्टी थकबाकीमुळे कारवाई करत सील केले होते. या बैठकीत महापालिका व पाटबंधारे (जलसंपदा) विभागातील थकबाकीबाबत सविस्तर चर्चा झाली. महापालिकेने आतापर्यंत भरलेल्या रकमेची पडताळणी करून ती समायोजित करण्याची मागणी करण्यात आली. तसेच जलसंपदा विभागाने लावलेली आकारणी व दंडाबाबत लवादाकडे सूट देण्याबाबत प्रस्ताव महापालिकेने सादर केला आहे.

            दोन्ही बाजूंच्या थकबाकी रकमा समायोजन करून निव्वळ देय रक्कम निश्चित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आला. यावर्षी जलसंपदा विभागाला ७ कोटी 4० लाख रुपये महापालिकेने अदा करण्यात आले असून, ३१ मार्चपर्यंत उपलब्धतेनुसार आणखीन काही रक्कम देण्याचा प्रयत्न महापालिकेकडून केला जाणार आहे.

            दरम्यान, जलसंपदा विभागाच्या मागणीनुसार थकीत रक्कम माफ करण्याबाबत शासन स्तरावर बैठक घेऊन अंतिम निर्णय केला जाईल, अशी माहिती महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी दिली.

            या बैठकीस कार्यकारी अधिकारी स्मिता माने, उपमहापौर अक्षय जरग, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. कौसर बागवान, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, सभागृह नेते मुरलीधर जाधव, गटनेते शारगंधर देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर तसेच जल अभियंता हर्षजीत घाटगे उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सु…