no images were found
फिनिक्स मार्केटसिटी मध्ये अॅथलीजर आणि स्पोर्ट्सवियर झोन सादर
पुणे : स्पोर्ट्स आणि अॅथलीजर खरेदी अनुभव आणखी सोपा आणि आनंददायी बनवत आहे, कारण फिनिक्स मार्केटसिटी पुणे मध्ये अनेक प्रसिद्ध ब्रँड्सचे स्टोअर्स आता एका ठिकाणी उपलब्ध आहेत. यामध्ये नाइकी, अॅडिडास, असिक्स, स्केचर्स यांचे प्रमुख फ्लॅगशिप स्टोअर्स आहेत, तसेच न्यू बॅलन्स, रिबॉक, प्यूमा, एक्सस्टेपसारखे ब्रँड्स देखील येथे आहेत. या नवीन झोनमुळे खरेदीदारांना स्पोर्ट्स आणि अॅथलीजर उत्पादनांचे अनेक पर्याय एकाच ठिकाणी मिळतात. फिनिक्स मार्केटसिटीने या झोनच्या माध्यमातून पुण्यातील वाढती फिटनेस संस्कृती आणि बदलत्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन एक खास स्पोर्ट्स आणि अॅथलीजर झोन तयार केला आहे.
याबद्दल बोलतांना, श्री अंशुमन भारद्वाज, सिनिअर सेंटर डायरेक्टर, फिनिक्स मॉल्स म्हणाले,“फिनिक्स मार्केटसिटी पुणे नेहमीच असे अनुभव देण्यावर लक्ष केंद्रित करत असते जे शहरासाठी उपयुक्त आणि महत्त्वाचे आहेत. स्पोर्ट्स आणि अॅथलीजर झोन हा त्याच दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. प्रमुख स्टोअर्स एका ठिकाणी एकत्र आल्यामुळे, आम्ही खेळांमध्ये रस असलेल्या खरेदीदारांसाठी तसेच ज्यांच्यासाठी अॅथलीजर दैनंदिन पोशाखाचा भाग आहे त्यांच्यासाठी एक उत्तम ठिकाण तयार केले आहे.”