Home Uncategorized पावनखिंड परिसरात ‘मेरा युवा भारत’ तर्फे स्वच्छता श्रमदान

पावनखिंड परिसरात ‘मेरा युवा भारत’ तर्फे स्वच्छता श्रमदान

2 second read
0
0
15

no images were found

पावनखिंड परिसरात ‘मेरा युवा भारत’ तर्फे स्वच्छता श्रमदान

कोल्हापूर,  : ‘शहीद दिना’चे औचित्य साधत युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार ‘मेरा युवा भारत’ (MY Bharat) कोल्हापूरच्या वतीने ऐतिहासिक पावनखिंड परिसरात ‘स्वच्छता श्रमदान’ उपक्रम उत्साहात पार पडला. या मोहिमेद्वारे तरुणांनी ऐतिहासिक वारसा स्थळांच्या जतन आणि स्वच्छतेचा संदेश दिला.

क्रांतिकारकांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात जिल्ह्यातील अनेक युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पावनखिंड परिसरातील प्लास्टिक कचरा, निर्माल्य आणि अन्य कचरा गोळा करून संपूर्ण परिसर चकाचक करण्यात आला. केवळ स्वच्छताच नव्हे, तर ऐतिहासिक वास्तूंचे पावित्र्य राखण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

या विशेष मोहिमेसाठी जिल्हा युवा अधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांनी शिस्तबद्ध पद्धतीने हे श्रमदान पूर्ण केले. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी समन्वयक निलेश कांबळे आणि संकेत गुरव यांनी विशेष परिश्रम घेतले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकावर तात्काळ बंदी घाला ! – हिंदुत्वनिष्ठांची आंदोलनाद्वारे मागणी

गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकावर तात्काळ बंदी घाला ! – हिंदुत्वनिष…