Home Uncategorized शिवाजी विद्यापीठात उद्या आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर

शिवाजी विद्यापीठात उद्या आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर

9 second read
0
0
15

no images were found

शिवाजी विद्यापीठात उद्या आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा भौतिकशास्त्र अधिविभाग, छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) रुग्णालय आणि नीम करौली बाबा चॅरिटेबल ट्रस्ट (कोल्हापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या, मंगळवारी (दि. २४) आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

उद्या सकाळी ठीक १०.१५ वाजता विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र सभागृहात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होईल. यावेळी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, व्यवस्थापन परिषद सदस्य स्वागत परुळेकर, भौतिकशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. राजेंद्र सोनकवडे, नीम करौली बाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या शीतल सोनकवडे, सीपीआर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, डॉ. भूषण मिरजे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणीअंतर्गत जनरल मेडिसिन, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, नेत्रतपासणी, दंतचिकित्सा, कान-नाक-घसा (ENT) आणि हृदयविकार तपासणी याबाबत मोफत सल्ला, उपचार व संदर्भ सेवा (Referrals) दिली जाईल. पूर्ण रक्त तपासणी (Full Blood Test) आणि लघवी तपासणीची सोय उपलब्ध असेल. गरजू सहभागींना आवश्यक औषधे विनामूल्य दिली जातील. 

शिबिर विद्यापीठातील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी असले तरी मर्यादित संख्येत नागरिकही यात सहभागी होऊ शकतात. ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर प्रवेश दिला जाईल. सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी https://forms.gle/X8eqJzuaKNzRMgk76 या गुगल फॉर्म लिंकवर आपली नोंदणी करावी. सर्व सहभागींनी सकाळी ९:३० वाजेपर्यंत शिबीरस्थळी उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. सोनकवडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी डॉ. एम. व्ही. टाकळे (८४५९४८३४३३), डॉ. ए. आर. पाटील (९६३७५१६०८७) आणि डॉ. एम. आर. वाईकर (९८६०८६१७५८) यांच्याशी संपर्क साधावा.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ मुंबई/कोल्हापूर,…