Home सामाजिक भंगार हे पुस्‍तक उकिरड्यावर जगणाऱ्या मुलाची संघर्षमय कहाणी – अशोक जाधव 

भंगार हे पुस्‍तक उकिरड्यावर जगणाऱ्या मुलाची संघर्षमय कहाणी – अशोक जाधव 

46 second read
0
0
14

no images were found

भंगार हे पुस्‍तक उकिरड्यावर जगणाऱ्या मुलाची संघर्षमय कहाणी – अशोक जाधव 

 
कोल्हापूर: भंगार ही उकिरड्या वर भंगार वेचून जगणाऱ्या मुलाची संघर्षमय कहाणी आहे, असे प्रतिपादन भंगार या आत्‍मकथनाचे लेखक अशोक जाधव यांनी केले. ते शिवाजी विद्यापीठाच्‍या मराठी विभागात पारंपरिक दिनाच्‍या समारंभात प्रमुख पाहुणे म्‍हणून बोलत होते. 
आपल्‍या मनोगतात ते म्हणाले की, हे पुस्‍तक उकिरड्यावर भंगार वेचून जगणाऱ्या समाजाचे जीवन, स्त्रियांची व मुलांची परिस्थिती, आणि शिक्षण घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्‍न करणाऱ्या प्रत्‍येकाची कहाणी आहे. भंगार हे संयमाचे उत्‍तम उदाहरण असून वाचकांसमोर ते अनेक प्रश्‍न उभे करते तसेच स्‍वतःचा शोधही घ्‍यायला भाग पाडते. 
या कार्यक्रमाचे अध्‍यक्ष मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. रणधीर शिंदे आपल्‍या मनोगतात म्‍हणाले मराठी साहित्‍यात उपेक्षितांचे जग वाचकांसमोर ठेवणाऱ्या काही महत्‍वाच्‍या पुस्‍तकांमध्‍ये अशोक जाधव यांच्‍या भंगार या पुस्‍तकाच्‍या उल्‍लेख करावा लागतो. माणसाला माणूसपणाची ओळख आणि भान देण्‍याचे काम अशोक जाधव यांनी आपल्‍या लेखनातून केले आहे. 
या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक आणि पाहूण्‍यांचा परिचय संजना शेरखाने तर सुत्रसंचालन सानिका सावंत आणि आभार सुरज गवळी यांनी मांडले.या कार्यक्रमासाठी प्राध्‍यापक डॉ. साठे, डॉ. सुखदेव एकल, प्रा. रवी लोंढे तसेच एम.ए. चे विद्यार्थी व संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.  
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

कोल्हापूरच्या पर्यटन वैभवात कागलच्या पर्यटन व नौकायन केंद्रामुळे भर:

कोल्हापूरच्या पर्यटन वैभवात कागलच्या पर्यटन व नौकायन केंद्रामुळे भर:मुख्यमंत्री देवेंद्र फ…