Home सामाजिक नूतन महापौरांचा ‘जनता दरबार’

नूतन महापौरांचा ‘जनता दरबार’

8 second read
0
0
26

no images were found

नूतन महापौरांचा ‘जनता दरबार’

कोल्हापूर,(प्रतिनिधी): कोल्हापूर महानगरपालिकेच्या नूतन महापौर म्हणून सौ. रुपाराणी निकम यांनी कोल्हापूर शहरातील नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी व नागरिकांच्या अडचणी थेट जाणून घेण्यासाठी दर महिन्याच्या ५ तारखेला ‘जनता दरबार’ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत गुरुवार, दि. ५ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात जनता दरबार आयोजीत केला आहे. या जनता दरबारामध्ये महापौर म्हणून सौ. रुपाराणी निकम नागरिकांच्या तक्रारी व मागण्या प्रत्यक्ष ऐकून घेणार आहेत. यावेळी आयुक्त के.मंजूलक्ष्मी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

            तरी शहरातील नागरिकांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात संबंधित कागदपत्रांसह या दिवशी सादर कराव्यात, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. नागरिकांच्या सहभागातून शहरातील प्रश्नांना प्राधान्याने मार्गी लावण्याचा महापौरांचा मानस आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…