Home विमा आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाइफतर्फे स्थैर्य आणि दीर्घकालीन संपत्ती निर्मिती करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी डिव्हिडंड लीडर्स 50 इंडेक्स फंड सादर

आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाइफतर्फे स्थैर्य आणि दीर्घकालीन संपत्ती निर्मिती करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी डिव्हिडंड लीडर्स 50 इंडेक्स फंड सादर

1 min read
0
0
14

no images were found

आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाइफतर्फे स्थैर्य आणि दीर्घकालीन संपत्ती निर्मिती करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी डिव्हिडंड लीडर्स 50 इंडेक्स फंड सादर

·        गुंतवणूक धोरण – सातत्यपूर्ण लाभांश वितरणाचा इतिहास असलेल्या मूलभूतदृष्ट्या मजबूत कंपन्यांमध्ये गुंतवणूक

·        नियमाधारित शिस्तबद्ध गुंतवणूक पद्धतीमुळे दीर्घकालीन संपत्ती निर्मिती सक्षम

·        अनेक क्षेत्रांमधील विविधीकरणामुळे स्थैर्य

 रत्नागिरी ,:आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाइफ इन्शुरन्सतर्फे आपल्या युनिट लिंक्ड इन्श्युरन्स प्लॅन्स (ULIPs) अंतर्गत डिव्हिडंड लीडर्स 50 इंडेक्स फंड सादर करण्यात आला आहे. नवीन फंडामुळे ग्राहकांना सातत्यपूर्ण लाभांश वितरणाचा सिद्ध इतिहास असलेल्या मूलभूतदृष्ट्या मजबूत शेअर्समध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन संपत्ती निर्माण करता येणार आहे.

   या सादरीकरणाबाबत प्रतिक्रियादेताना आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक अधिकारी श्री. मनीष कुमार म्हणाले, “डिव्हिडंड लीडर्स 50 इंडेक्स फंड ग्राहकांना मूलभूतदृष्ट्या सक्षम आणि सातत्यपूर्ण लाभांश इतिहास असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून इक्विटी बाजारपेठेत सहभागी होण्यासाठी शिस्तबद्ध आणि पारदर्शक मार्ग सादर करतो.

       फंडाचे धोरण चार स्तंभांवर आधारित आहे. त्यामध्ये लाभांश वितरणावर लक्ष केंद्रित करणारी शेअर निवडअधिक मजबूत आर्थिक स्थिती आणि स्थिर रोख प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी गुणवत्ता तपासणीअनेक क्षेत्रांमध्ये वैविध्यपूर्णतातसेच नियमीत आढावा आणि पुनर्संतुलन यांसह पारदर्शकनियमाधारित आणि शिस्तबद्ध गुंतवणूक प्रक्रिया यांचा समावेश आहे.

       महत्त्वाचे म्हणजेहा नवीन फंड आमच्या ग्राहकांना आत्मविश्वासाने गुंतवणूक कायम ठेवण्यास सक्षम करेल. याचे कारण त्यांचा पोर्टफोलिओ आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि काळाच्या कसोटीवर उतरलेल्या कंपन्यांशी संलग्न असणार आहे. हे सादरीकरण आमच्या ULIP ग्राहकांसाठी जीवन संरक्षणासह शिस्तबद्धपारदर्शक आणि उच्च-गुणवत्तेची गुंतवणूक संधी देण्याच्या प्रवासातील आणखी एक पाऊल आहे.”

        हा फंड व्यापक BSE 500 विश्वातील मागील 10 वर्षांमध्ये सातत्याने लाभांश वितरित केलेल्या निवडक 50 कंपन्यांच्या कामगिरीचा मागोवा घेणाऱ्या BSE 500 डिव्हिडंड लीडर्स 50 इंडेक्स फंडचे अनुसरण करतो. निर्देशांकात 50 घटकांचा समावेश असून तो दरवर्षी पुनर्संतुलित केला जातो. या फंडद्वारेआम्ही आमच्या ग्राहकांना काळाच्या ओघात आर्थिक सामर्थ्य आणि भागधारकांप्रती बांधिलकी सिद्ध केलेल्या कंपन्यांमध्ये प्रवेश देत आहोत.

       इतिहास बघता निर्देशांकाच्या तथ्यपत्रकानुसार 30 जानेवारी 2026 पर्यंत तीन वर्षांसाठी 33.63%, पाच वर्षांसाठी 30.96% आणि दहा वर्षांसाठी 20.40% वार्षिक एकूण परतावा दर्शविला आहे. त्यातून शिस्तबद्ध गुंतवणूक धोरणाची दीर्घकालीन क्षमता अधोरेखित होते. तथापिनियमांनुसार कंपनीला वेळोवेळी निर्देशांकातील त्यांच्या वजनानुसार सर्व शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास मर्यादा येऊ शकतात. परिणामीट्रॅकिंग एरर होण्याची शक्यता आहे. हा फंड सक्रियपणे शेअर्स निवडण्याऐवजी निर्देशांकातील शेअर्सचा मागोवा घेणारी पॅसिव्ह, निर्देशांक-प्रतिबिंबित पद्धत स्वीकारतो.

      डिव्हिडंड लीडर्स 50 इंडेक्स फंड हा आयसीआयसीआय प्रु सिग्नेचर अश्युअरआयसीआयसीआय प्रु स्मार्टकिड अश्युअरआयसीआयसीआय प्रु स्मार्ट इन्शुरन्स प्लॅन प्लस (SIP+) यांसारख्या  www.iciciprulife.com वर उपलब्ध इतर ULIP उत्पादनांप्रमाणे कंपनीच्या काही लोकप्रिय ULIP उत्पादनांसह उपलब्ध आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
  • आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाइफतर्फे स्थैर्य आणि दीर्घकालीन संपत्ती निर्मिती करू इच्छिणाऱ्या ग…
Load More In विमा
Comments are closed.

Check Also

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण        &n…