Home शोक वार्ता डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट येथे मंगळवारी  ‘टेक्नॉलॉजीया  2026’ चे आयोजन

डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट येथे मंगळवारी  ‘टेक्नॉलॉजीया  2026’ चे आयोजन

18 second read
0
0
23

no images were found

डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट येथे मंगळवारी  ‘टेक्नॉलॉजीया  2026’ चे आयोजन

कोल्हापूर(प्रतिनिधी): डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट येथे  २४ फेब्रुवारी  रोजी राष्ट्रीय स्तरावरील आंतरमहाविद्यालयीन टेक फेस्ट ‘टेक्नॉलॉजीया  2026’ चे  आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजल्यापासून सुरू होणाऱ्या या महोत्सवात राज्यासह देशभरातील विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

      तंत्रज्ञान, व्यवस्थापन, सर्जनशीलता आणि रणनीती यांचा संगम असलेल्या या टेक फेस्टमध्ये तब्बल ₹१ लाखांची बक्षिसे आणि प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना योग्य व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धांमध्ये रोबो रेस, कोड शफल, शार्क टँक, डिबेट, रील बॅटल, ॲड मॅड, आयपीएल ऑक्शन, मिनी प्रोजेक्ट, स्क्वेड गेम अशा विविध आकर्षक स्पर्धांचा समावेश आहे. तांत्रिक कौशल्यांसोबतच व्यवस्थापन, सर्जनशीलता आणि रणनीतीची कसोटी या स्पर्धांमधून पाहायला मिळणार आहे.

       या सोहळ्यासाठी झंवर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालिका जिया झंवर या विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे  कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा व कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव होणार आहे.

       स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डेप्युटी रजिस्ट्रार प्रा. अश्विन देसाई, अनिकेत परदेशी आणि दीपक पाटील त्याचबरोबर विद्यार्थी समन्वयक रितेश कोल्हे, आर्या उलपे कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मेहनत घेत आहेत. मर्यादित जागांमुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शोक वार्ता
Comments are closed.

Check Also

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक कोल्हापूर : …