Home मनोरंजन पूजा कटुर्देने सांगितले बाइक सीनच्या शूटिंगदरम्यान सुरक्षितता आणि भावना यांचा समतोल कसा साधला 

पूजा कटुर्देने सांगितले बाइक सीनच्या शूटिंगदरम्यान सुरक्षितता आणि भावना यांचा समतोल कसा साधला 

6 second read
0
0
18

no images were found

पूजा कटुर्देने सांगितले बाइक सीनच्या शूटिंगदरम्यान सुरक्षितता आणि भावना यांचा समतोल कसा साधला 

   सोनी सबचा लोकप्रिय शो ‘पुष्पा इम्पॉसिबल’, जो आपल्या प्रेरणादायी कथेसाठी आणि प्रेक्षकांना जवळचा वाटणाऱ्या पात्रांसाठी ओळखला जातो, आता एक जबरदस्त सीक्वेन्स घेऊन येतो आहे. या सीनमध्ये पुष्पा (करुणा पांडे) आणि प्रार्थना (पूजा कटुर्दे) एकत्र बाइकवर दिसणार आहेत. हा सीन तणाव आणि भावनांनी भरलेला असून, त्यात तातडीची परिस्थिती आणि जबरदस्त इमोशन्स दाखवले आहेत.

      हा सीक्वेन्स कलाकारांसाठी भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या खूपच आव्हानात्मक होता. सीनमध्ये पूजा कटुर्देला बाइक चालवायची होती आणि करुणा पांडे त्यांच्या मागे बसल्या होत्या. स्क्रीनवर हा क्षण जितका रोमांचक दिसतो, तितकाच कठीण होता त्याचे शूटिंग. यासाठी अनेकदा रिहर्सल्स करण्यात आल्या, दोघींमध्ये योग्य समन्वय साधावा लागला आणि एकमेकींवर पूर्ण विश्वास ठेवावा लागला. कारण सीनमध्ये भावनांचा भार खूप होता, त्यामुळे पूजा आणि करुणा दोघींनाही त्या क्षणात पूर्णपणे गुंतून राहावे लागले, तसेच बाइक चालवताना सुरक्षिततेची काळजी घ्यावी लागली. सेटवर वातावरण गंभीर होते कारण सगळ्यांना माहित होते की हा सीन योग्य प्रकारे करणे किती महत्त्वाचे आहे.

     आपल्या अनुभवाबद्दल बोलताना पूजा कटुर्दे म्हणाल्या, “करुणा मॅडम माझ्या मागे बसल्या होत्या आणि त्या क्षणी मला खूप जबाबदारी जाणवत होती. मला रस्ता, कॅमेरा आणि भावना या तिन्ही गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे लागले. आम्ही फाइनल टेकच्या आधी अनेकदा प्रॅक्टिस केली कारण सुरक्षितता खूप महत्त्वाची होती. शूटिंगदरम्यान मला खरंच सीनचा तणाव जाणवत होता आणि त्याने माझी परफॉर्मन्स आणखी चांगली झाली. करुणा मॅडम सतत मला सपोर्ट करत होत्या आणि शांत राहायला सांगत होत्या. सीन पूर्ण झाल्यावर आम्ही दोघी खूप भावुक झालो. हे आव्हानात्मक होतं, पण माझ्यासाठी एक अभिनेत्री म्हणून खूप खासही होतं.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

विद्यापीठात ‘जीएसटी’च्या अनुषंगाने २३ मार्चपासून राष्ट्रीय चर्चासत्र

विद्यापीठात ‘जीएसटी’च्या अनुषंगाने २३ मार्चपासून राष्ट्रीय चर्चासत्र कोल्हापूर,(प्रति…