no images were found
अविनेश रेखी ‘सोनी सब’च्या ‘गणेश कार्तिकेय’ मालिकेत भगवान शिवाची शक्ती साधण्यासाठी पूर्ण मौन धारण करतो.
सोनी सबवरील पौराणिक गाथा गाथा शिव परिवार की – गणेश कार्तिकेय भक्ती, सामर्थ्य आणि दिव्य ध्येयाची प्रभावी कहाणी रंगवत आहे. या मालिकेच्या केंद्रस्थानी आहे अविनेश रेखी, जो भगवान शिवाची भूमिका साकारत आहे. ही भूमिका केवळ प्रभावी उपस्थितीच नव्हे तर गहन शांततेचीही मागणी करते.
अविनेश रेखीची तयारी दिग्दर्शक “ॲक्शन” म्हणण्याच्या खूप आधीपासून सुरू होते. लाईट्स, भव्य वेशभूषा आणि क्रूच्या हालचालींच्या गडबडीत तो सेटवर काही शांत क्षण शोधतो. विशेष म्हणजे, निर्मिती टीमने खास “सायलन्स रूम” तयार केली आहे—शूटिंगच्या गोंगाटापासून दूर अशी जागा, जिथे अविनेश स्वतःला केंद्रित करतो आणि दिव्य दृश्यांसाठी सज्ज होतो. या मौनाच्या क्षणांमुळे तो गोंधळापासून दूर जातो आणि भगवान शिवाच्या आध्यात्मिक गहनतेशी जोडला जातो. शूटिंगपूर्वीची ही स्थिरता त्याचा आधार बनते. वेशभूषेत उभा राहून डोळे मिटणे, श्वास नियंत्रित करणे किंवा दृश्याचा सराव करणे—या सगळ्यातून अविनेश आपल्या पात्रातील संयम आणि सौंदर्य आत्मसात करतो. त्याच्यासाठी भगवान शिवाची भूमिका म्हणजे नाट्यमय उंची नव्हे, तर नियंत्रित ऊर्जा आणि शांत सामर्थ्य.
आपल्या प्रक्रियेबद्दल बोलताना अविनेश रेखी म्हणतो, “सेटवर नेहमीच लाईट्स लावणे, शेवटच्या क्षणी टच-अप्स, कॅमेरा रिहर्सल्स अशा गडबडी सुरू असतात. पण मी महत्त्वाच्या दृश्यांपूर्वी आमच्या सायलन्स रूममध्ये जाण्याचा नियम केला आहे. ती अशी जागा आहे जिथे मी फक्त स्थिर राहू शकतो. भगवान शिव अपार सामर्थ्याचे प्रतीक आहेत, पण त्याचबरोबर गहन ध्यान आणि शांततेचेही. तो समतोल दाखवण्यासाठी मला आतून केंद्रित व्हावं लागतं. त्या शांत क्षणांमुळे माझा श्वास नियंत्रित होतो, विचार स्वच्छ होतात आणि मी पूर्णपणे भगवान शिवाच्या दिव्यतेत तल्लीन होतो. ‘ॲक्शन’ म्हटल्यावर मी अविनेश म्हणून विचार करत नाही, तर भगवान शिव म्हणून प्रतिसाद देतो.”