Home मनोरंजन 13 फेब्रुवारी रोजी रेणुका शहाणे आणि अभिनय बेर्डे अभिनीत ‘उत्तर’ घरोघरी पोहोचणार: आई-लेकामधील हळुवार नात्याचे बंध प्रेक्षकांच्या भेटीला

13 फेब्रुवारी रोजी रेणुका शहाणे आणि अभिनय बेर्डे अभिनीत ‘उत्तर’ घरोघरी पोहोचणार: आई-लेकामधील हळुवार नात्याचे बंध प्रेक्षकांच्या भेटीला

16 second read
0
0
25

no images were found

 13 फेब्रुवारी रोजी रेणुका शहाणे आणि अभिनय बेर्डे अभिनीत ‘उत्तर’ घरोघरी पोहोचणार: आई-लेकामधील हळुवार नात्याचे बंध प्रेक्षकांच्या भेटीला

       कायमच पुढे जाण्याच्या लगबगीत असलेल्या दुनियेला सातत्याने डावलल्या जाणाऱ्या प्रश्नावर विचार करायला लावणारे ‘उत्तर’. आपण कायमच ‘उद्या बघू’ म्हणून जे टाळतो त्याचे नेमके काय होते? अव्यक्त प्रेमावरील भाष्य. पुढे ढकलण्यात आलेले सत्य. क्षमाशीलतेसाठी वेळ असतो असे गृहीत धरले जाते. आपल्या शांत भावनिक प्रामाणिकपणाने चित्रपटगृहातील प्रेक्षकांच्या मनाला भिडलेला, उत्तर आता 13 फेब्रुवारी रोजी मराठी झी ५ वरील वर्ल्ड डिजिटल प्रीमिअरद्वारे देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज आहे.

      मनातून अगदी खोलवर हेलावणारे आणि जिव्हाळ्याचे मानवी नाट्य, ‘उत्तर’ प्रेम, संबंध, क्षमा आणि स्वत्व या नेहमीच ‘उद्यावर’ ढकलल्या जाणाऱ्या स्थगित भावनिक मूल्यांचा शोध घेते. ही कलाकृती दैनंदिन वास्तवात रुजलेली असली तरी तिच्या प्रतिध्वनीत सार्वत्रिक असलेला हा सिनेमा त्या नाजूक क्षणांचे चित्रण करतो. वेळ आपल्या हातातून निसटून जाताना जीवन अशी उत्तरं मागते जी देण्यास आपण तयार नसतो. संवेदनशीलता, संयम आणि अस्सल भावनिक स्पष्टतेसह उत्तर सापडते. फायनल फ्रेमनंतरही बराच काळ मनात रेंगाळते. जे क्षण आपण पुढे ढकलतो आणि नात्यातील जे बंध वाट पाहतील असं आपण गृहीत धरतो; त्यावर चिंतन करण्यास आमंत्रित करते.या कलाकृतीच्या केंद्रस्थानी प्रेम, महत्त्वाकांक्षा आणि वाढत्या मौनामुळे आकार घेतलेले एक कोमल, गुंतागुंतीचे आई-मुलाचे नाते आहे. उमा ही एक आई. जिची उबदार माया शांतपणे तिच्या कुटुंबाला एकत्र ठेवते. निनाद हा एक तरुण. घरापासून जवळजवळ नकळत दूर जात असताना जीवनात पुढे जात असताना, स्वतःचा संघर्ष बाजूला ठेवून परिस्थितीला दोष न देता भावनिक अंतर पार करण्याच्या कसरतीत दिसतो. समकालीन जीवनाच्या आणि पिढ्यांदरम्यान होणाऱ्या बदलाच्या लयबद्धतेवर आधारित, ‘उत्तर’ हे दर्शविते की नातेसंबंध अनेकदा संघर्षातून नव्हे, तर योग्य क्षणाची, योग्य शब्दांची, योग्य वेळेच्या प्रतिक्षेत कसे तुटतात!

        क्षितिज पटवर्धन लिखित आणि दिग्दर्शित, आणि झी स्टुडिओज आणि जॅकपॉट एंटरटेनमेंट निर्मित, ‘उत्तर’ मध्ये रेणुका शहाणे आणि अभिनय बेर्डे यांच्या भूमिका अत्यंत प्रभावी आहेत. तसेच ह्रुता दुर्गुळे आणि निर्मिती सावंत यांची अदाकारी अधिकच भावनिक सखोलता जोडणारी आहे. परिस्थिती आई आणि मुलाच्या नात्याला एका वळणावर आणत असताना, प्रेम, क्षमा आणि शेवटी एकमेकांसाठी; स्वतःसाठी दाखवावे लागणारे धैर्य आत्म्याला हेलावणाऱ्या शोधात कथा उलगडतात.

        या चित्रपटाबद्दलचे आपले विचार मांडताना रेणुका शहाणे म्हणाल्या, “उमाची व्यक्तिरेखा ही धैर्य, प्रेम आणि गोष्टी अखेरीस मार्गाला लागतील या अव्यक्त आशेवर आकार घेतलेले पात्र आहे. उमा साकारणे अतिशय भावूक करणारे होते. कारण तिच्या शांततेला शब्दांइतकाच आवाज होता. उत्तर आता अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल म्हणून मी आभारी आहे. जिथे मनातील भावना अगदी जवळून अनुभवल्या जाऊ शकतील”.

        अभिनय बेर्डे पुढे म्हणाला, “निनाद’ हा सतत पुढे जाणाऱ्या एका पिढीचे प्रतिनिधित्व करतो. अनेकदा आपण मागे काय सोडले याचे परीक्षण करण्याइतपत वेळ निनादकडे नसतो. मी निनाद वठवताना मला महत्त्वाकांक्षा, भावनिक अंतर आणि घराचे मनातून वाटणारे आकर्षण प्रतिबिंबित करण्यास मदत झाली. ‘उत्तर’ आता झी ५ वर प्रेक्षकांच्या भेटीला येईल याचा मला आनंद आहे”.

      दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन यांनी सांगितले की, “उत्तर हा नेहमीच आयुष्यासारखा वाटला. सौम्य, निराकरण न झालेला आणि सखोल मानवी. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, या उक्तीवर विश्वास ठेवून जे अमूल्य क्षण आपण पुढे ढकलतो त्या क्षणांबद्दल आहे. चित्रपटाच्या डिजिटल प्रीमिअरमुळे प्रेक्षकांना स्वत:च्या सोयीने या भावनिक गाभ्याचा वेध घेण्याची मुभा मिळते. ही कलाकृती प्रेक्षकांना आपलीशी वाटेल आणि मनात बराच काळ रेंगाळेल”.उत्तर 13 फेब्रुवारी 2026 पासून केवळ झी ५ वर स्ट्रीम होईल

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…