Home अधिवेशन डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात शुक्रवारपासून दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात शुक्रवारपासून दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद

6 second read
0
0
21

no images were found

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात शुक्रवारपासून दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद

कोल्हापूर(प्रतिनिधी):डी. वाय. पाटील अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालय, कसबा बावडा येथे शुक्रवार ६ फेब्रुवारी पासून दोन दिवसीय ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन रिसेंट ट्रेंड्स इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

      या परिषदेत संगणक अभियांत्रिकी, विद्युत व इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार, सिव्हिल व पर्यावरण अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, केमिकल इंजिनिअरिंग, फूड टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आदी विविध अभियांत्रिकी शाखांतील नवीन संशोधन प्रवाह, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण कल्पनांवर चर्चा होणार आहे.
या आंतरराष्ट्रीय परिषदेचे डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील मुख्य अतिथी असून डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे प्र कुलपती ऋतुराज पाटील आणि विश्वस्त पृथ्वीराज पाटील आणि डी. वाय. पाटील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता कुलगुरू यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

       या परिषदेत अमेरिका, युनायटेड किंगडम, मलेशिया आणि देशभरातील वक्ते सहभागी होणार आहेत. यामध्ये प्रा. पर्सी इंजिनिअर (सार्वजनिक विद्यापीठ, सुरत), प्रा. मायकेल जॉन (टीसाईड युनिव्हर्सिटी, युनायटेड किंगडम), डॉ. कलावानी चेल्लप्पन ( युनिवर्सिटी केबंग्सन, मलेशिया) व प्रा. निलांजन डे (टेक्नो इंटरनॅशनल न्यू टाऊन, कोलकाता) यांचा समावेश आहे.

      सयाजी हॉटेलच्या मेघमल्हार सभागृहात या परिषदेचे उद्घाटन होणार असून मार्गदर्शन व चर्चासत्रे महाविद्यालयात होणार आहेत. संशोधकांना स्कोपस डिजिटल लायब्ररी मध्ये प्रकाशनाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.डॉ. मनिषा भानुसे, संयोजक व समन्वयक म्हणून काम पाहत असून प्राचार्य डॉ एस. डी. चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांचे विशेष सहकार्य लाभले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In अधिवेशन
Comments are closed.

Check Also

हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदायाचा मोठा विजय!

  हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदायाचा मोठा विजय! वारकरी संप्रदायाची बदनामी कर…