यंदाचा अर्थसंकल्प विकसित भारताच्या पुर्ततेचं आणखी एक पाऊल, खासदार धनंजय महाडिक
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प विकसित भारताच्या पुर्ततेचं आणखी एक पाऊल आहे. पायाभूत विकासांवर भर देतानाच महिला, शेतकरी, युवक आणि उद्योजक अशा चारही घटकांना योग्य न्याय अर्थसंकल्पातून मिळाला आहे. काळाची पावलं ओळखत आरोग्य, शिक्षण आणि तंत्रज्ञान बळकटीसाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि व्यापक दुरगामी हिताचा म्हणावा लागेल.