Home मनोरंजन जोतीराव फुले आणि लहुजी वस्ताद यांचं प्रेरणादायी नातं उलगडणार

जोतीराव फुले आणि लहुजी वस्ताद यांचं प्रेरणादायी नातं उलगडणार

3 second read
0
0
29

no images were found

जोतीराव फुले आणि लहुजी वस्ताद यांचं प्रेरणादायी नातं उलगडणार

स्टार प्रवाहच्या मी सावित्रीबाई जोतीराव फुले या मालिकेत लवकरच समाजसुधारणेच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण अध्याय प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जोतीराव फुले यांच्या सामाजिक क्रांतीच्या लढ्यातील महत्त्वाचे आधारस्तंभ लहुजी वस्ताद यांची मालिकेत एण्ट्री होणार आहे. क्रांतीगुरु लहुजी वस्ताद अर्थात लहुजी राघोजी साळवे यांनी ब्रिटिश सत्तेचा प्रतिकार करण्यासाठी १८२२ मध्ये एक तालीम सुरू केली आणि पुण्यातील मुलांना लष्करी प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. शस्त्र शिक्षण घेण्यासाठी लहुजींच्या तालमीत जोतीराव फुले येत असत. जोतीराव फुले आणि लहुजी वस्ताद साळवे यांचं नातं हे केवळ गुरु-शिष्याचं नव्हतं तर विचार, संघर्ष आणि सामाजिक परिवर्तनाचं प्रतीक होतं. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात पहिली शाळा सुरू केली तेव्हा या दाम्पत्याला प्रचंड विरोध झाला. परंतु लहुजी वस्ताद या दोघांच्याही पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या पाठबळावर जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला. फुले दाम्पत्याला त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात पाठिंबा देऊन अस्पृश्य बांधवांना शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी लहुजींनी प्रयत्न केले. सुप्रसिद्ध अभिनेते विश्वजीत फडते लहुजी वस्तांदांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

लहुजी वस्ताद आणि जोतीराव फुले यांचं नातं केवळ ऐतिहासिक संदर्भापुरतं न राहता, सामाजिक परिवर्तनाच्या प्रवासाचा महत्त्वाचा टप्पा म्हणून मालिकेच्या माध्यमातून सादर केलं जाणार आहे. इतिहासातील हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा अनुभवण्यासाठी नक्की पहा मी सावित्रीबाई जोतीराव फुले सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर. 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक कोल्हापूर : …