Home मनोरंजन छोट्या पडद्यावर ‘बिग बॉस मराठी ६’चा डंका ! रितेश भाऊंच्या ‘लयभारी’ स्वॅगने बहरला ग्रँड प्रीमियर!

छोट्या पडद्यावर ‘बिग बॉस मराठी ६’चा डंका ! रितेश भाऊंच्या ‘लयभारी’ स्वॅगने बहरला ग्रँड प्रीमियर!

5 second read
0
0
23

no images were found

छोट्या पडद्यावर ‘बिग बॉस मराठी ६’चा डंका !
रितेश भाऊंच्या ‘लयभारी’ स्वॅगने बहरला ग्रँड प्रीमियर!

कोल्हापूर: “शेकडो दारं, अनेक सदस्य… आणि एकच बॉस!” असं म्हणत सुरू झालेल्या ‘बिग बॉस मराठी ६’ च्या अभूतपूर्व यशाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. या सिझनच्या पहिल्याच आठवड्यात रितेश भाऊंने सर्वांचं मन जिंकलं आहे. रितेश भाऊंचा तोच कडक अंदाज, त्यांचा जबरदस्त स्वॅग आणि प्रेक्षकांशी संवाद साधण्याची त्यांची खास शैली यामुळे हा सिझन घराघरांत पोहोचला आहे. रितेश भाऊंच्या जादूने यंदा केवळ टीव्हीच नाही, तर डिजिटल जगतावरही अधिराज्य गाजवलं असून, खऱ्या अर्थाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर आपली मोहोर उमटवली आहे. कलर्स मराठी आणि JioHotstar वर एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या या सिझनने लोकप्रियतेचे सर्व जुने विक्रम मोडीत काढले आहेत.
कलर्स मराठीवर, ग्रँड प्रीमियर आणि दैनंदिन भागांना जोरदार सुरुवात मिळाली असून, लाँचिंगच्या पहिल्याच आठवड्यात ३३ लाखांहून अधिक प्रेक्षकांनी हा कार्यक्रम पाहिला. ‘बिग बॉस मराठी’च्या आगमनामुळे मराठी जनरल एंटरटेनमेंट चॅनेलच्या (GEC) प्रेक्षकसंख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ दिसून आली आहे; ३४ GRPs वरून ७७ GRPs पर्यंत झालेली ही २.३ पट वाढ या शोची जनमानसातील पकड अधोरेखित करते. जिओ स्टार पहिल्या भागाच्या ‘रीच’मध्ये ५ व्या सीझनच्या प्रीमियरच्या तुलनेत २.२ पट आणि ‘वॉच-टाइम’मध्ये ६.५ पट वाढ नोंदवण्यात आली. पहिल्या आठवड्यात जिओ स्टारवर देखील हा वेग कायम राहिला; गेल्या सीझनच्या तुलनेत व्हिडिओ व्ह्यूजमध्ये १.८ पट आणि वॉच-टाइममध्ये १.३ पट वाढ झाली असून, हे प्रेक्षकांचा वाढता कल आणि वारंवार पाहिल्या जाणाऱ्या संख्येचे निदर्शक आहे..
या अभूतपूर्व यशाचे मोठे श्रेय जाते ते म्हणजे महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार आणि शोचा होस्ट रितेश देशमुख यांना. प्रोमो रिलीज झाल्यापासूनच रितेश भाऊंच्या कडक डायलॉग्स नी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. “मागचा सिझन वाजवलाय, यंदाचा गाजवायचाय… आहात ना तय्यार!” या त्यांच्या वाक्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली होती. ग्रँड प्रीमियर च्या दिवशी रितेश भाऊंचा तो अस्सल महाराष्ट्रीयन स्वॅग, ‘लार्जर-दॅन-लाईफ’ परफॉर्मन्स आणि त्यांच्या एन्ट्री ने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. त्यांचं प्रभावी सूत्रसंचालन, आणि त्यांच्या शब्दांमधली धार यामुळे ग्रँड प्रीमियर ची रंगत अजूनच वाढली. या सगळ्यामुळेच सिझन ६ चा ग्रँड प्रीमियर हा विक्रमी टीआरपी मिळवणारा कार्यक्रम ठरला आहे. बिग बॉस मराठीच्या घरात १७ सदस्यांनी मोठ्या दिमाखात एंट्री घेतली, आणि संपूर्ण आठवडा प्रेक्षकांना राडा, भांडणं, मैत्री, याने खिळवून ठेवले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…