Home स्पोर्ट्स चंदूर  बुद्धिबळ विजेता 2026  खुल्या   बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात प्रारंभ

चंदूर  बुद्धिबळ विजेता 2026  खुल्या   बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात प्रारंभ

21 second read
0
0
67

no images were found

चंदूर  बुद्धिबळ विजेता 2026  खुल्या   बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात प्रारंभ

इचलकरंजी (प्रतिनिधी) :- चेस असोसिएशन कोल्हापूर व चेस असोसिएशन इचलकरंजी यांच्या मान्यतेने  स्वामी विवेकानंद पतसंस्था चंदुर आणि  विद्यार्थी युवक ग्रंथालय चंदूर. आयोजित  खुल्या गट बुद्धिबळ स्पर्धा *चंदूर बुद्धिबळ विजेता २०२६* मराठी शाळा  चंदूर च्या कै.अण्णा नागोंडा पाटील  सभागृहामध्ये रविवारी  मोठ्या उत्साहात सुरू झाल्या .        बेळगाव,सांगली, कोल्हापूर,जयसिंगपूर, ,   इचलकरंजी व स्थानिक चंदूर मधील  एकूण 96 नामांकित बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्विस् लीग पद्धतीने जलद बुद्धिबळाचे आंतरराष्ट्रीय नियमानुसार खुल्या  गटात एकूण सात   फेऱ्यात ही स्पर्धा होत आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन पतसंस्थेचे अध्यक्ष रवींद्र झेले ग्रंथालय चे अध्यक्ष विजयकुमार पाटील  यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून करण्यात आले. यावेळी  स्पर्धा आयोजक  संचालक प्रवीण पाटील सुरेश कुंभार सर , रघुनाथ शिरढोणे , संतोष कुंभार सचिन पाटील व मनोज पाटील व इतर सर्व संचालक उपस्थित होते या स्पर्धा पार पाडण्यासाठी प्रमुख पंच म्हणून करण परीट (वरिष्ठ राष्ट्रीय  पंच),सहाय्यक पंच म्हणून मोहिनीराज डांगे (राष्ट्रीय  पंच) व विजय सलगर (राज्य पंच) यांनी काम पाहिले व यांच्यासह बुद्धिबळपटू व पालक उपस्थित होते. ग्रंथालयाचे संचालक रघुनाथ शिरढोणे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन केले.

 आज झालेल्या पाचव्या फेरीनंतर  रवींद्र निकम  , अथर्व तावरे इचलकरंजी  हे दोघ पाच  गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत तर  रुद्र माने  इचलकरंजी,वेदांत बांगड इचलकरंजी हे दोघे जण साडेचार गुणांसह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत. आयोजका कडुन सर्व खेळाडूना  नाश्ताची सोय केली .

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स
Comments are closed.

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…