Home शैक्षणिक डिजिटल युगातील अध्यापनासाठी शिवाजी विद्यापीठात ई-कन्टेन्ट व ऑनलाइन पेडॅगॉजी कार्यशाळा

डिजिटल युगातील अध्यापनासाठी शिवाजी विद्यापीठात ई-कन्टेन्ट व ऑनलाइन पेडॅगॉजी कार्यशाळा

15 second read
0
0
26

no images were found

डिजिटल युगातील अध्यापनासाठी शिवाजी विद्यापीठात ई-कन्टेन्ट व ऑनलाइन पेडॅगॉजी कार्यशाळा

कोल्हापूर(प्रतिनिधी):शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने पीएम-उषा योजनेंतर्गत विविध विद्याशाखांतील अध्यापन व अध्ययन अधिक गुणवत्तापूर्ण, डिजिटलदृष्ट्या सक्षम आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने “ई-कन्टेन्ट डेव्हलपमेंट आणि ऑनलाइन पेडॅगॉजी” या विषयावर दि. १२ व १३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संचालक डॉ. कृष्णा पाटील यांनी दिली.

       या कार्यशाळेसाठी पुणे येथील विद्यादीप फाउंडेशनचे शैक्षणिक तंत्रज्ञ डॉ. दीपक ताटपुजे तसेच व्हिडिओ एडिटर व Google Gemini Certified Educator श्री. सतीश शेंडे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

      या कार्यशाळेत विविध विद्याशाखांतील शिक्षकांसाठी; ई-कन्टेन्ट निर्मिती, डिजिटल व ऑनलाइन पेडॅगॉजी, LMS आधारित अध्यापन, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शैक्षणिक वापर, तसेच कंटेन्ट डिझाइन व मल्टिमीडिया निर्मिती या आधुनिक व कालसुसंगत घटकांवर प्रत्यक्ष (hands-on) प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाणार आहे.

       नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, NAAC, NIRF आणि डिजिटल शिक्षणाच्या गरजांच्या पार्श्वभूमीवर ही कार्यशाळा अत्यंत महत्त्वाची असून सर्व संबंधित शिक्षक, अभ्यासक व संशोधकांनी या कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संचालक डॉ. कृष्णा पाटील यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक
Comments are closed.

Check Also

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शि…