Oplus_131072
no images were found
पोस्टल मतदानाद्वारे आज 284 मतदान दोन दिवसात 726 मतदान
कोल्हापूर,(प्रतिनिधी): कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांपैकी आज दुसऱ्या दिवशी 284 कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजाविला. दोन दिवसात सात निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये 726 पोस्टल मतदानाची प्रक्रिया पार पडली. यामध्ये 316 महिला कर्मचारी व 410 पुरुष कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.