Home संस्कृतिक न्यू कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी.         

न्यू कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी.         

22 second read
0
0
52

no images were found

न्यू कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी.                                                          कोल्हापूर (प्रतिनिधी):भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती  न्यू कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर मध्ये मोठ्या उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरी करण्यात आली. ३ जानेवारी हा दिवस ‘महिला मुक्ती दिन’ आणि ‘बालिका दिन’ म्हणूनही ओळखला जातो.

सकाळी १० वाजता महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहात कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . रवींद्र कुंभार सर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्राचार्यांनी आपल्या भाषणात सावित्रीबाईंच्या विचारांचे आचरण करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते. 

 

 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In संस्कृतिक
Comments are closed.

Check Also

महाराष्ट्रात रेल्वे फाटकमुक्त  होण्यासाठी पायाभूत सुविधा उभारा: रेल्वेच्या ६५ पायाभूत सुविधांच्या कामांना मान्यतां -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात रेल्वे फाटकमुक्त  होण्यासाठी पायाभूत सुविधा उभारा: रेल्वेच्या ६५ पायाभूत…