Home उद्योग शापूरजी पल्लोनजी रियल एस्टेटने पुणे ग्रोथ कॉरिडोरमध्ये 105 एकरांच्या प्रकल्पासह प्लॉटेड डेव्हलपमेंटमध्ये प्रवेश 

शापूरजी पल्लोनजी रियल एस्टेटने पुणे ग्रोथ कॉरिडोरमध्ये 105 एकरांच्या प्रकल्पासह प्लॉटेड डेव्हलपमेंटमध्ये प्रवेश 

3 second read
0
0
26

no images were found

शापूरजी पल्लोनजी रियल एस्टेटने पुणे ग्रोथ कॉरिडोरमध्ये 105 एकरांच्या प्रकल्पासह प्लॉटेड डेव्हलपमेंटमध्ये प्रवेश 

~ सुमारे 600 कोटी रुपयांच्या महसूल क्षमतेसह ~

पुणे,: भारतातील विश्वासार्ह रिअल इस्टेट विकासकांपैकी एक असलेल्या शापूरजी पल्लोनजी रियल एस्टेट (एसपीआरई) ने आज पुणे ग्रोथ कॉरिडोरमध्ये 105 एकरांवरील प्रीमियम प्लॉटेड प्रकल्प ‘ट्रीटोपिया’च्या माध्यमातून प्लॉटेड डेव्हलपमेंट क्षेत्रात प्रवेश केल्याची घोषणा केली. या प्रकल्पातून सुमारे 600 कोटी रुपयांच्या महसूलाची अपेक्षा आहे.

आगामी पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ, प्रस्तावित आयटी पार्क तसेच प्रस्तावित इनर आणि आउटर रिंग रोड्सजवळ स्थित असलेला हा प्रकल्प, प्लॉटेड डेव्हलपमेंटसाठी वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर एसपीआरई च्या निवासी पोर्टफोलिओचा धोरणात्मक विस्तार आहे. या प्रकल्पात 2,000 ते 6,000 चौ.फुट क्षेत्रफळाच्या 483 नियोजनबद्ध निवासी प्लॉट्सचा समावेश असेल, जे अंतिम ग्राहक आणि दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी डिझाइन करण्यात आले आहेत.

कमी घनतेचा आणि निसर्गाधारित विकास म्हणून डिझाइन करण्यात आलेल्या या प्रकल्पात सुमारे 70 टक्के क्षेत्र मोकळ्या व हिरवळीच्या जागांसाठी राखीव आहे. सुमारे 600 एकर जंगल क्षेत्राने वेढलेला हा प्रकल्प स्वच्छ हवा आणि निसर्गसंपन्न वातावरण प्रदान करतो.

या प्रकल्पात सुमारे 3 एकरांचा क्लब हाऊस, सुमारे 25 एकरांची तलाव, सुमारे 1.5 किमी लांबीचा लेकसाइड प्रोमेनेड आणि 35 पेक्षा अधिक जागतिक दर्जाच्या सुविधा असतील. यामध्ये धरण, बार्बेक्यू झोन्स तसेच विविध मनोरंजन आणि वेलनेस सुविधा समाविष्ट आहेत. 18 मीटर रुंद, वृक्षराजीने सजलेला सेंट्रल अव्हेन्यू सर्व निवासी प्लॉट्सना सामायिक सुविधांशी जोडेल.

प्रकल्पाच्या लॉन्चवेळी प्रतिक्रिया देताना, शापूरजी पल्लोनजी रियल एस्टेटचे सीईओ श्री. सुमित सप्रू म्हणाले, “पुणे ग्रोथ कॉरिडोर सुधारित कनेक्टिव्हिटी आणि वाढत्या निवासी मागणीमुळे एक महत्त्वाचा इन्फ्रास्ट्रक्चर-आधारित बाजार म्हणून उदयास येत आहे. प्लॉटेड डेव्हलपमेंटबाबत घरखरेदीदारांमध्ये वाढती रुची पाहता, ट्रीटोपिया हा आमच्या निवासी पोर्टफोलिओसाठी महत्त्वाचा टप्पा आहे.”

ते पुढे म्हणाले, “मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे या भागाचा विकास वेग घेत आहे. पुणे ग्रोथ कॉरिडोर भविष्यात एक उच्च क्षमतेचा मायक्रो-मार्केट ठरेल आणि ट्रीटोपिया या दीर्घकालीन वाढीचा लाभ घेत ग्राहकांना मालकी व विकासातील लवचिकता प्रदान करेल.”

ट्रीटोपिया येथे वैयक्तिक 7/12 असलेले एन.ए. प्लॉट्स उपलब्ध असतील, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार स्वतंत्र व्हिला उभारता येतील. रहिवाशांना हडपसर, हडपसर अ‍ॅनेक्स, एसपी इन्फोसिटी, मगरपट्टा आणि खराडी तसेच पुण्यातील प्रमुख शैक्षणिक व आरोग्य संस्थांपर्यंत सुलभ पोहोच मिळेल.

पुणे ग्रोथ कॉरिडोरमध्ये प्रस्तावित विमानतळ, आयटी पार्क, इनर व आउटर रिंग रोड्स, वाढते व्यावसायिक क्षेत्र आणि आयटी व औद्योगिक क्लस्टर्सच्या विस्तारामुळे वेगाने विकास होत आहे. या घडामोडींमुळे पुणे शहरातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासोबतच निवासी व गुंतवणूक आधारित रिअल इस्टेटसाठी नवीन मागणी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग
Comments are closed.

Check Also

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण        &n…