no images were found
डीओसी या लोकप्रिय आंतरराष्ट्रीय मेडिकल ड्रामाचे हिंदीत रूपांतर करणार
भारताची आघाडीची हिंदी जनरल एन्टरटेन्मेंट चॅनल सोनी सब घेऊन येत आहे- ‘हुई गुम यादें – एक डॉक्टर, दो जिंदगियां’. जगभरात वाखणल्या गेलेल्या डीओसी– नेल्ले तुई मनी या इटालियन मेडिकल ड्रामाचे हे अधिकृत भारतीय रूपांतर आहे. करुणा, चिवटपणा, मानवी आत्म्याचा विजय दर्शविणारे दमदार कथानक असलेल्या डीओसी या मालिकेचे पाच देशांत, तेथील स्थानिक भाषांमध्ये रूपांतर झाले असून जगभरात मालिकेची प्रशंसा झाली आहे. ‘हुई गुम यादें – एक डॉक्टर, दो जिंदगियां’च्या रूपात सोनी सब वाहिनी भारतीय प्रेक्षकांसाठी एक प्रभावी कथानक घेऊन येत आहे.
मूळ मालिकेच्या भावनिक गाभ्याशी इमान राखून बनवलेल्या भारतीय आवृत्तीत एका बुद्धिमान डॉक्टरची वेधक कहाणी आहे. एका भयंकर अपघाताच्या आघातामुळे त्याच्या स्मृतीमधून काही वर्षे पुसली गेली आहेत. तो आपली ओळख, नाती आणि कारकीर्द पुन्हा उभी करण्याचा प्रयत्न करत आहे. असे करताना वैद्यक शास्त्राकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन बदलला आहे. सहानुभूती, हळवेपणा आणि मानवी स्पर्श त्याने या शास्त्राला दिला आहे. पारंपरिक महिला-केंद्रित कथानकाला फाटा देत या मालिकेच्या केंद्रस्थानी पुरुष पात्र आहे. या मालिकेच्या माध्यमातून भारतीय टेलिव्हिजनला एक नवा, ताजातवाना दृष्टीकोन मिळेल.
सोनी सबचे बिझनेस हेड अजय भाळवणकर म्हणाले की,डीओसी चे भारतीय रूपांतर ‘हुई गुम यादें – एक डॉक्टर, दो जिंदगियां’ आमच्या प्रेक्षकांसमोर सादर करताना आम्ही रोमांचित आहोत. सोनी सबवर नवनवीन विषय घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न या मालिकेच्या रुपातूनही दिसतो. एक बहुआयामी पुरुष नायकाला केंद्रस्थानी ठेवणारी ही भावनिक स्पर्श असलेली ‘हुई गुम यादें’ ही मालिका असा दृष्टिकोन मांडते, जो जीईसी च्या प्रांतात नवीन आणि अर्थपूर्ण आहे. आम्हाला विश्वास वाटतो की, हा नव्या प्रकारच्या दृष्टिकोन आमच्या प्रेक्षकांना खूप आवडेल. आणि त्यामुळे दर्जेदार, व्यक्तिरेखा-आधारित मनोरंजन सादर करण्याच्या सोनी सबच्या वचनबद्धतेला आणखी बळकटी मिळेल.”
सोनिका भसीन, व्हीपी, डिस्ट्रिब्यूशन, साऊथ एशिया, सोनी पिक्चर्स एन्टरटेन्मेंट, डीओसी चे फॉरमॅट ओनर्स म्हणाल्या की,डीओसी फॉरमॅट त्यातील ठळक भावनिक कथानकामुळे जगभरात गाजला आहे आणि ती उच्च मूल्याची जागतिक संपत्ती आहे. अशी संपत्ती भारतासारख्या महत्त्वाच्या टेरिटरीमध्ये लॉन्च करण्यासाठी आम्हाला एक असा पार्टनर हवा होता, ज्याच्यात भारतीय प्रेक्षकांशी समरस होण्याची क्षमता असेल आणि चांगल्या कौटुंबिक मालिका सादर करण्याचा अनुभव असेल. म्हणूनच आम्ही सोनी सबची निवड केली. आम्हाला खात्री आहे की, या रूपांतराबाबत त्यांनी दाखवलेला अनोखा दृष्टिकोन हे सुनिश्चित करेल की, ‘हुई गुम यादें – एक डॉक्टर, दो जिंदगियां’ ही मालिका इथल्या प्रेक्षकांना केवळ आपलीशी वाटणार नाही, तर या जगात वाखाणल्या गेलेल्या मालिकेचा वारसा निर्वेधपणे पुढेही घेऊन जाईल.”
उत्कंठावर्धक नाट्य, हृदयस्पर्शी क्षण आणि गुंतागुंतीच्या व्यक्तिरेखा यांचा मिलाफ घडवणारी ‘हुई गुम यादें’ ही मालिका प्रेक्षकांना प्रेरित, उन्नत करणाऱ्या आणि त्यांचा भावनिक सहभाग साधणाऱ्या सोनी सबच्या वचनबद्धतेशी अगदी सुसंगत आहे.