Home सामाजिक आचारसंहितेमुळे महापालिकेचा व्हिजिटर डे व लोकशाही दिन स्थगित

आचारसंहितेमुळे महापालिकेचा व्हिजिटर डे व लोकशाही दिन स्थगित

7 second read
0
0
41

no images were found

आचारसंहितेमुळे महापालिकेचा व्हिजिटर डे व लोकशाही दिन स्थगित

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने प्रशासक के. मंजूलक्ष्मी या दर बुधवारी व गुरुवारी दुपारी 3 ते 6 या वेळेत नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी व्हिजीटर डे आयोजित करीत होत्या. तसेच महापालिकेशी संबंधित नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण व्हावे यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी (शासकीय सुट्टी असल्यास दुसऱ्या दिवशी) लोकशाही दिन आयोजित करण्यात येत होता.

            मात्र, महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025–26 अनुषंगाने शहरात सोमवार सायंकाळपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या आचारसंहितेच्या कालावधीत महापालिकेचा व्हिजीटर डे तसेच लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार नाही. याची संबंधित नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…