no images were found
‘इत्ती सी खुशी’ मालिकेत राजनाथ वर्माच्या भूमिकेत फारूख सईद
सोनी सबवरील ‘इत्ती सी खुशी’ मालिकेतील दिवेकर कुटुंबाचे आनंद, संघर्ष आणि नातेसंबंध यांचे चित्रण पाहताना प्रेक्षक रंगून गेले आहेत. अन्विता (सुंबुल तौकीर खान) आणि संजय (ऋषी सक्सेना) यांच्या विवाहामुळे दिवेकरांच्या कुटुंबात मोठा बदल झाला आहे आणि आता मालिकेत आणखी एक वळण येणार आहे. कथानकात आणखी गहनता आणि तीव्रता आणण्यासाठी परिचित अभिनेता फारूख सईद विराट(रजत वर्मा) चे वडील राजनाथ वर्मा यांच्या दमदार आणि गूढ भूमिकेत दाखल होत आहे.
राजनाथ वर्मा स्वतःच्या कर्तृत्वाने मोठा झालेला व्यावसायिक आहे आणि ताकद आणि आपल्या मोठ्या मुलाला गमावल्याच्या दुःखामुळे कठोर झाला आहे. स्वतःच्या प्रतिष्ठेचे सतत ओझे बाळगणाऱ्या राजनाथसाठी ‘इज्जत सब से ऊपर’ आहे. आपल्या ऐश्वर्याखाली आणि अधिकाराखाली मनातील असुरक्षित भावना तो लपवत आला आहे. भावनांना थारा न देणारा आणि वर्चस्व गाजवणारा राजनाथ कठोर वृत्तीचा आहे आणि तो सतत हुकूम सोडत असतो. आपला लहान मुलगा विराट याच्याशी त्याचे उभे पटत नाही. विराटच्या स्वभावतील करुणा आणि त्याचे आदर्श राजनाथच्या आग्रही स्वभावाला पटत नाहीत. वारसा, नियंत्रण आणि सामाजिक प्रतिमा जपण्याचा आटापिटा करणाऱ्या राजनाथला आपल्या समोर उभा असलेला आपला हाडामासाचा मुलगा दिसू शकत नाहीये.
या मालिकेत दाखल होण्याबाबत फारूख सईद म्हणतो, “राजनाथ वर्मा एक अशी व्यक्तिरेखा आहे, जिच्यातील गुंतागुंत तुम्हाला आकर्षित करते. वरवर पाहता तो सामर्थ्यशाली आहे, यश आणि सन्मानाच्या त्याच्या स्वतःच्या ठाम कल्पना आहेत, पण त्याखाली मात्र एक असा माणूस आहे, जो उद्ध्वस्त झालेला आहे, दुःखी आहे आणि साध्या साध्या भावना त्याला व्यक्त करता येत नाहीत. त्याच्या स्वभावातील या द्वंद्वाने मला आकर्षित केले. एक अभिनेता म्हणून, मी राजनाथची व्यक्तिरेखा करण्यासाठी सिद्ध झालो, जो खंबीर दिसतो पण भावनिकदृष्ट्या कमजोर आहे पण तो स्वतः ते मान्य करत नाही. त्याचे आणि विराटचे नाते सामान्य पिता-पुत्राचे नाते नाही. त्यांच्यात विचारसरणीचे द्वंद्व आहे, भीती आहे आणि जखमा आहेत. मालिकेच्या टीमने मला खूप मदत केली. राजनाथचा प्रवास प्रेक्षकांना कसा वाटतो, हे पाहण्यास मी उत्सुक आहे.”