Home मनोरंजन ‘इत्ती सी खुशी’ चे 100 भाग सादर झाल्याचा आनंदोत्सव साजरा 

‘इत्ती सी खुशी’ चे 100 भाग सादर झाल्याचा आनंदोत्सव साजरा 

12 second read
0
0
26

no images were found

‘इत्ती सी खुशी’ चे 100 भाग सादर झाल्याचा आनंदोत्सव साजरा 

संबद्ध कथानक आणि हृदयस्पर्शी भावनांचे चित्रण करणाऱ्या सोनी सबवरील ‘इत्ती सी खुशी’ मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. ही अन्विता (सुंबुल तौकीर खान) या तरुणीची कहाणी आहे, जी आपल्या कुटुंबाचा भक्कम आधार आहे. तिच्या आयुष्याला एक वेगळे वळण मिळाले आहे, कारण तिला सोडून गेलेला विराट (रजत वर्मा) आता परतला आहे आणि आपल्याला दुसरी संधी मिळावी अशी त्याची मागणी आहे. अन्विता द्विधा मनःस्थितीत आहे. तिने संजय (ऋषी सक्सेना) सोबत पुढे जाण्याचे ठरवले आहे. पण संजयच्या मनातील छुपे हेतू कहाणीत नवी गुंतागुंत निर्माण करत आहेत. हृदयस्पर्शी क्षण आणि वेधक ट्विस्ट यांची सुंदर सांगड घालणारी ही मालिका देशभरातील प्रेक्षकांना आपलीशी वाटत आहे.

या मालिकेने 100 एपिसोडचा टप्पा गाठला आहे, त्या निमित्ताने यातील कलाकार आणि निर्माते मंडळी यांनी हा क्षण कृतज्ञतेच्या भावनेने साजरा केला. अन्विताच्या मनातील भावनिक चढउतार, विराटशी निर्माण झालेले तिचे नाते आणि संजय भोसलेच्या भूमिकेमुळे कथानकात येणारी वळणे हे सारे प्रेक्षकांना भावले आहे.

टिप्पण्या

अन्विताची भूमिका साकारणारी सुंबुल तौकीर खान म्हणते, “मला सेटवरचा आमचा पहिला दिवस अजून आठवतो. ते भांबावलेपण, उत्सुकता, तालमी, थट्टा-मस्करी.. आम्ही कुणीच ही कल्पना केली नव्हती की अन्विताची कहाणी 100 एपिसोडपर्यंत अशी वळणे घेत घेत पोहोचेल. या मालिकेने मला अन्विताप्रमाणे जीवनातील छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घ्यायला शिकवले. प्रेक्षकांनाकडून मिळणारा प्रत्येक संदेश आणि त्यांचे प्रेम मला ही जाणीव देते की आम्ही या क्षेत्रात का आहोत! अन्विताला इतकी आपुलकी देणाऱ्या प्रेक्षकवर्गाची मी मनःपूर्वक आभारी आहे.”

विराटची भूमिका करणारा रजत वर्मा म्हणतो, “100 एपिसोड पूर्ण होत असताना मला शूटिंगचे सुरुवातीचे दिवस आठवत आहेत, जेव्हा सुंबुल, ऋषी आणि मी एकत्र बसून यावर चर्चा करायचो की आपल्या व्यक्तिरेखा कशा विकसित होत जातील. त्या चर्चांनंतर पडद्यावर साकारलेली कथा बघणे खूप खास आहे. विराटची भूमिका करताना मी व्यक्तिरेखेचे विविध स्तर उलगडायला शिकत आहे. प्रेक्षकांनाही ही व्यक्तिरेखा आपलीशी वाटली आहे, ही भावना फारच प्रोत्साहक आहे, सार्थकता देणारी आहे. त्यांच्या प्रेमामुळे कथानक जीव ओतून जिवंत करण्याची प्रेरणा आम्हाला मिळत राहते.”

एसीपी संजयची भूमिका करत असलेला ऋषी सक्सेना म्हणतो, “दैनंदिन नाती आणि भावना यांचे चित्रण करणाऱ्या ‘इत्ती सी खुशी’ मालिकेचा भाग असणे हा एक सुंदर अनुभव आहे. प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आणि समर्थनामुळे आम्ही 100 भाग पूर्ण केले आहेत, त्यामुळे आम्ही केलेल्या कष्टाचे सार्थक झाले असे वाटत आहे. इतक्या समर्पित टीमसोबत मी हा प्रवास करत असल्याबद्दल मनात कृतज्ञतेची भावना आहे. यापुढेही आणखी मोठे टप्पे आम्ही पार करू अशी अशा आहे.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

घराला पूर्णत्व देणाऱ्या बाईची हृदयस्पर्शी कथा ‘बाई तुझा आशीर्वाद’

घराला पूर्णत्व देणाऱ्या बाईची हृदयस्पर्शी कथा ‘बाई तुझा आशीर्वाद’ मराठी मालिका विश्वात नेह…