Home स्पोर्ट्स डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या दोघांना खेलो इंडियामध्ये कास्यपदक

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या दोघांना खेलो इंडियामध्ये कास्यपदक

0 second read
0
0
30

no images were found

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या दोघांना खेलो इंडियामध्ये कास्यपदक

कोल्हापूर (प्रतिनिधी):जयपूर राजस्थान येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 मध्ये डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे खेळाडू अथर्व गंगाराम पाटील, रणवीर अजितसिंह काटकर यांनी 10 मीटर एअर रायफल या प्रकारात कांस्य पदक पटकावले.

24 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत जयपूर येथे खेलो इंडिया स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये 10 मीटर एअर रायफल या प्रकारात सांघिक गटातून अथर्व गंगाराम पाटील, रणवीर अजितसिंह काटकर यांनी दमदार कामगिरी नोंदवत कांस्यपदक जिंकले.

अथर्व पाटील हा सिव्हिलच्या तृतीय वर्षाचा तर रणवीर काटकर हा आर्किटेक्चर शाखेचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. त्यांना अधिष्ठाता आणि जिमखाना प्रमुख डॉ. राहुल पाटील, क्रीडा संचालक इजाज गडकरी यांचे मार्गदर्शन लाभले.

अथर्व व रणवीरने मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटी, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे यांनी अभिनंदन केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…