Home Uncategorized हिवाळ्यातील परंपरा आणि सुंदर आठवणी यांना उजाळा देत आहेत सोनी सबचे कलाकार

हिवाळ्यातील परंपरा आणि सुंदर आठवणी यांना उजाळा देत आहेत सोनी सबचे कलाकार

2 second read
0
0
32

no images were found

हिवाळ्यातील परंपरा आणि सुंदर आठवणी यांना उजाळा देत आहेत सोनी सबचे कलाकार

हिवाळा असा मोसम असतो, जो जगाला हळुवार थंडीत लपेटतो आणि त्यासोबत एक ऊब आणि एकत्रपणाची भावना देखील घेऊन येतो. या मोसमात एकत्र येऊन गरमागरम जेवणाचा आस्वाद घेतात. मोसमी पदार्थांचा सुवास वतावरणात दरवळतो आणि ऊबदार क्षणांभोवती आठवणी विणल्या जातात. वाफाळत्या चहाच्या कपापासून ते घरच्या गरमागरम, सुग्रास जेवणापर्यंत हिवाळ नाना तऱ्हेने लोकांना एकत्र आणतो आणि त्यांच्या मनाला तो ऊबदारपणा देतो. यावर्षी सोनी सबचे कलाकार आपल्या हिवाळ्याच्या सुंदर आठवणी, या मोसमातील आपले प्रिय खाद्यपदार्थ याबाबत शेअर करत आहेत. त्या आठवणींची ऊब अनुभवताना हा मोसम का खास आहे, हे सांगत आहेत.

‘इत्ती सी खुशी’ मालिकेत हेतल दिवेकरची भूमिका करणारी नेहा एस के मेहता म्हणते, “वडोदरा आणि अहमदाबादमध्ये मी लहानाची मोठी झाले. आम्हा गुजराती घरांमध्ये हिवाळा नेहमीच खास असायचा. थंडी वाढू लागली की माझी आई उंधियू सारखे खास हिवाळ्यातील पारंपरिक पदार्थ करायची. सकाळच्या थंडीत आजीसोबत बसून तिळाचे लाडू वळल्याची आठवण देखील मनात ताजी आहे. स्वयंपाकघराच्या आणि तिच्या काहण्यांच्या ऊबेने ते क्षण खरोखर जादुई होऊन जायचे. आजही, मी सेटवर कितीही गुंतलेले असले, तरी थंडीच्या दिवसाची सुरुवात मी आवर्जून हळद आणि गूळ घातलेले दूध पिऊन करते. माझ्यासाठी हिवाळा म्हणजे मस्त ऊब, आपल्या प्रियजनांचा सहवास आणि चिरकाल टिकणाऱ्या आठवणी निर्माण करण्याचा काळ.”

‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत चिरागची भूमिका करणारा नितीन बाबू म्हणतो, “माझ्या हृदयात हिवाळ्याचे विशेष स्थान आहे कारण हा ऋतु मला जम्मू आणि काश्मीरमधल्या माझ्या भद्रवाह गावाची आठवण करून देतो. मी डोंगरात वाढलो आहे, त्यामुळे मी हे अनुभवले आहे की, थंडीत सारे काही कसे स्वच्छ, पांढरे शुभ्र दिसते. माझी आई खास काश्मिरी पदार्थ वाजवान बनवायची, त्यावेळी घरभर त्या मसाल्यांचा सुगंध दरवळायचा. कुटुंबासोबत बुखारीजवळ बसून काहवाचा आस्वाद घेतल्याच्या सुस्पष्ट आठवणी अजून ताज्या आहेत. आजही, थंडी आली की मला ते दिवस आठवतात. मी निसर्गप्रेमी आहे आणि माझ्यासाठी, हिवाळ्यातील डोंगर हा माझ्या मनाला शांती देण्याचा उत्तम इलाज आहे. हिवाळा आपल्याला थोडे संथ व्हायला सांगतो, जे अर्थपूर्ण आहे त्याच्याशी निगडीत व्हायला आणि साधेपणात शांती शोधायला सांगतो.”

‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत प्रार्थनाची भूमिका करणारी पूजा कातुर्डे म्हणते, “माझ्यासाठी हिवाळा म्हणजे खाण्यापिण्याची चंगळ! मी पुण्याची आहे. हिवाळ्याच्या दिवसांत पारंपरिक मराठी पदार्थांची मेजवानी असते, त्यामुळे मला थंडीचे दिवस आवडतात. माझ्या आठवणीत थंडीच्या दिवसात तिळगूळ करणारी आजी आहे. मला हिवाळा विशेष आवडतो, कारण तो सगळ्यांना एकत्र आणतो. त्या थंड हवेतच असे काही तरी असते की सगळे जण एकमेकांच्या जवळ येतात, एकत्र जेवतात आणि अशी नाती निर्माण करतात जी तो ऋतु संपल्यानंतर देखील टिकून राहतात. आजही, शूटिंग चालू असताना त्या परंपरा चालू ठेवण्याचा माझा प्रयत्न असतो. सह-कलाकारांसोबत गरमागरम जेवणाचा आणि गप्पांचा स्वाद काही औरच असतो. माझ्यासाठी हिवाळा घर, कुटुंबाचे महत्त्व आणि साध्या-साध्या, हृद्य क्षणांचे सौंदर्य जाणवून देणारा ऋतु आहे.”

 

‘गाथा शिव परिवार की – गणेश कार्तिकेय’ मालिकेत देवी पार्वतीची भूमिका करणारी श्रेनु परीख म्हणते, “हिवाळा माझा आवडता ऋतु आहे, कारण तो लोकांमध्ये, कुटुंबांमध्ये एक ऊब घेऊन येतो. मी वडोदरा येथे वाढले. येथे माझ्या कुटुंबासोबत हिवाळ्याच्या खूप सुंदर आठवणी आहेत. हिवाळ्यातील सण, पारंपरिक पदार्थ आणि सगळ्यांनी एकत्र घालवलेले क्षण आजही आठवतात. हिवाळा कसा सहजपणे सगळ्यांना एकत्र आणतो. मी नियमित योग करते आणि मला वाटते की या मोसमात आपली गती थोडी कमी केली पाहिजे. आपल्या माणसांसोबत गरमागरम जेवणाचा आस्वाद घेतला पाहिजे आणि विचार करण्यात थोडा वेळ घालवला पाहिजे. हिवाळा मला घराची आणि कौटुंबिक परंपरांची आठवण करून देतो. आजही, माझे शूटिंगचे धकाधकीचे वेळापत्रक असताना देखील मी त्या साध्या पण अर्थपूर्ण क्षणांमध्ये हरवून जाते.”

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…