Home निवड जयसिंगपूरच्या दिव्या पाटील ची राष्ट्रीय शालेय  बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात तिसऱ्यांदा  निवड    

जयसिंगपूरच्या दिव्या पाटील ची राष्ट्रीय शालेय  बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात तिसऱ्यांदा  निवड    

1 min read
0
0
94

no images were found

जयसिंगपूरच्या दिव्या पाटील ची राष्ट्रीय शालेय  बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात तिसऱ्यांदा  निवड         

                                                                         कोल्हापूर (प्रतिनिधी):- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व  सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने कला व वाणिज्य महाविद्यालय, सातारा येथे आयोजित केलेल्या शालेय शासकीय महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेत एकोणवीस वर्षाखालील मुलींच्या गटात जयसिंगपूरच्या दिव्या पाटील ने सहापैकी साडेचार गुण करून आपले महाराष्ट्र संघातील स्थान निश्चित केले… यामुळे दिव्याची १९ वर्षाखालील मुलींच्या गटातील शालेय राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अशाप्रकारे सलग तिसऱ्यांदा दिव्याची निवड महाराष्ट्र संघात  राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी होत आहे… यापूर्वी दोन्ही वेळा दिव्याने महाराष्ट्राला रौप्यपदक मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला आहे.. स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया च्या वतीने होत असणाऱ्या राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा बेंगलोर येथे दिनांक ५ ते ७ डिसेंबर दरम्यान होणार आहे.   *एकोणवीस वर्षाखालील मुलींचा निवड झालेला महाराष्ट्र संघ*:- 1) श्रावणी उंडाळे (पुणे) 2) श्रुती काळे (छत्रपती संभाजीनगर)3) देवांशी गावंडे (अमरावती) 4) अनुष्का कुतवळ (पुणे)5) दिव्या पाटील (कोल्हापूर)                                                                                                             दिव्या जयप्रभा इंग्लिश मीडियम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, जयसिंगपूर मध्ये अकरावीत शिकत आहे. दिव्याला बुद्धिबळ प्रशिक्षक रोहित पोळ, उत्कर्ष लोमटे व समुख गायकवाड यांचे आजपर्यंत विशेष बुद्धिबळ प्रशिक्षण लाभले आहे. त्याचबरोबर शाळेच्या  मुख्याध्यापिका सौ स्मिता पाटील मॅडम, क्रीडा शिक्षक राहुल सरडे सर, दिव्याचे आई-वडील कविता व शरद पाटील चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष भरत चौगुले व सचिव मनिष मारुलकर यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शि…