no images were found
दीप्ती आपल्या बाळाला कदंबरीच्या कटापासून वाचवू शकेल का?
सोनी सबवरील ‘पुष्पा इम्पॉसिबल’ ही मालिका आपल्या प्रेरणादायी कथानकामुळे आणि हृदयस्पर्शी पात्रांमुळे प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आहे. पुष्पा (करुणा पांडे) वकील होण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेत असताना तिच्या निर्धाराची आणि नात्यांच्या बंधांची परीक्षा घेणाऱ्या नव्या अडचणी तिच्यासमोर येतात.
आगामी भागांमध्ये दीप्ती (गरिमा परिहार) आपल्या बाळांना जन्म देते, त्यामुळे पटेल कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. मात्र, हा आनंद फार काळ टिकत नाही, कारण कादंबरीला (बृंदा त्रिवेदी) दीप्तीच्या जुळ्या बाळांबद्दल कळताच ती त्यातील एक बाळ चोरण्याचा गुप्त डाव रचते. त्यामुळे हे कुटुंब नव्या सुरुवातीचा आनंद साजरा करत असतानाच एक धक्कादायक वळण येणार आहे, त्यामुळे पुष्पा आणि तिच्या जवळच्या सर्वांना एका अनपेक्षित सत्याचा सामना करावा लागणार आहे.
पुष्पा कादंबरीचा फसवणुकीचा खेळ उघड करणार की कादंबरी तिचं काळं रहस्य लपवण्यात यशस्वी ठरणार?
या ट्रॅकबद्दल बोलताना कदंबरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री बृंदा त्रिवेदी म्हणाली, “पुष्पा इम्पॉसिबलमधील कादंबरीची भूमिका साकारणं हा माझ्या अभिनय प्रवासातील सर्वात भावनिक आणि गुंतागुंतीच्या अनुभवांपैकी एक आहे. कादंबरी वाईट आहे म्हणून ती वाईट वागते, असं नाही, तर ती जे करते ते योग्यच आहे, असे तिला वाटते, हेच तिला जास्त धोकादायक बनवतं. येणाऱ्या भागांमध्ये ती कल्पनेच्या सीमा ओलांडते, ते प्रसंग साकारणे मला अभिनेत्री म्हणून खूप आव्हानात्मक होते. यासाठी मला तिच्या अंतर्मनात शिरून ती असं का करते, हे समजून घ्यावं लागलं.”