Home मनोरंजन कलाकार सांगत आहेत यावर्षी ते भाऊबीज कशी साजरी करणार

कलाकार सांगत आहेत यावर्षी ते भाऊबीज कशी साजरी करणार

9 second read
0
0
46

no images were found

कलाकार सांगत आहेत यावर्षी ते भाऊबीज कशी साजरी करणार
या भाऊबीजेला सोनी सबवरील कलाकार – समृद्ध बावा, सुंबुल तौकीर खान, ऋषी सक्सेना आणि श्रेनु परीख साजरे करत आहेत भावा-बहिणीतले प्रेम, काळजी आणि सख्याचे कालातीत नाते. हा सण केवळ हे खास नाते मजबूत करत नाही, तर लहानपणीच्या सहवासाच्या सुखद आठवणी, थट्टा-मस्करी, एकमेकांची बाजू घेतल्याचे लोभस क्षण आणि भावा-बहिणीच्या नात्यातील छोट्या छोट्या सुंदर गोष्टींचा गोडवा साजरा करतो.

 ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत अश्विनची भूमिका करणारा समृद्ध बावा म्हणतो, “आमच्यासाठी भाऊबीजेचे विशेष महत्त्व आहे. माझी बहीण सांची माझ्याहून चार वर्ष मोठी आहे आणि ती दिल्लीत राहते. त्यामुळे कामाच्या व्यापामुळे आमची वरचेवर भेट होत नाही. सामान्यतः ती सणासुदीला घरी येते किंवा मी दिल्लीला तिच्याकडे जातो. या वर्षी शूटिंगमुळे मी जाऊ शकणार नाही. त्यामुळे मी तिला एक सर्प्राइज गिफ्ट द्यायचे ठरवले आहे. तिला संगीताची खूप आवड आहे, म्हणून मी तिला एक स्मार्टवॉच, ब्लूटुथ ईयरबड्स किंवा पोर्टेबल स्पीकर्स द्यायचे ठरवले आहे. ज्यामुळे ती आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद कुठेही, केव्हाही घेऊ शकेल.”

 ‘इत्ती सी खुशी’ मालिकेत अन्विताची भूमिका करणारी सुंबुल तौकीर खान म्हणते, “माझ्यासाठी, पहिल्यापासून भाऊबीज म्हणजे प्रेम आणि संरक्षणाच्या भावनेचा आनंदोत्सव. माझ्यासाठी, हा सण मी माझ्या बहिणीसोबत साजरा करते. पारंपरिक रित्या हा भाऊ-बहिणीचा सण असला तरी मी आणि माझी बहीण आपापल्या परीने हा सण साजरा करतो. लहानपणापासून आमची ही परंपरा सुरू आहे. ती माझ्याकडे “मैं भी भाई से कम नहीं” असे सांगून भेटवस्तूची लाडिक मागणी करायची. आम्ही अजूनही ती मजेदार परंपरा चालू ठेवली आहे. आम्ही मिठाईची देवाणघेवाण करतो, एकमेकींची थट्टा-मस्करी करतो आणि आमच्या जुन्या खोड्या आठवून खूप हसतो. आमच्यासाठी भाऊबीजेचा संबंध विधींशी फारसा नाही तर बहिणी म्हणून आमच्यात जे मैत्रीचे आणि आधाराचे नाते आहे, ते साजरे करण्याचा हा दिवस आहे.”

 ‘इत्ती सी खुशी’ मालिकेत संजयची भूमिका करणारा ऋषी सक्सेना म्हणतो, “माझा जवळजवळ समस्त परिवार जयपूरला राहतो. मला स्पष्ट आठवते आहे की, आम्ही सर्व जण काटेकोरपणे नवरात्रीचे व्रत करायचो आणि मग भाऊबीजेची वाट बघायचो. तेव्हा सगळे एकत्र व्हायचो, धमाल करायचो आणि आनंदाने सण साजरा करायचो. खरं तर, आमच्यासाठी पहिल्यापासून भाऊबीज हा खूप मौज-मस्ती करण्याचा दिवस आहे. घरची सर्व मंडळी उपस्थित असायची आणि हा दिवस, हास्य-विनोद, खेळ, पत्ते खेळून साजरा व्हायचा. आम्ही जेव्हा लहान होतो, तेव्हा आम्ही सर्व चुलत भावंडे क्रिकेट खेळायचो. कधी कधी तर बागेत संपूर्ण टेनिस बॉल मॅच चालायची. किंवा आम्ही कुठे एकत्र झालो आहोत, यावर अवलंबून गच्चीत एक टप्पा-एक हाताने केलेला कॅच आउट मानणारा क्रिकेटचा खेळ चालायचा.”

 ‘गाथा शिव परिवार की – गणेश कार्तिकेय’ मालिकेत पार्वतीची भूमिका करणारी श्रेनू परीख म्हणते, “माझ्यासाठी पहिल्यापासून भाऊबीज हा एक खास सण आहे, कारण तो माझा भाऊ शुभमसाठी आणि आमच्या नात्यासाठी समर्पित असलेला दिवस आहे. तो माझ्यापेक्षा लहान आहे. पण खरं सांगायचं तर बऱ्याचदा तो माझ्यापेक्षा अधिक परिपक्व असल्यासारखा वागतो. (हसते) लहानपणी या सणाच्या निमित्ताने आम्ही खूप मौज करायचो, एकमेकांची थट्टा-मस्करी करायचो, आणि फराळावर ताव मारायचो. मी त्याच्यावर दादागिरी करायचे! आणि तो देखील त्याचे उत्तर देण्याची संधी शोधायचा. आजही, आम्ही कितीही कामात गुंतलेलो असलो, तरी हा सण एकत्र साजरा करतो, प्रत्यक्ष भेटून किंवा व्हर्च्युअल भेटीतून. माझ्यासाठी, भाऊबीज हा केवळ एक विधी नाही, तर लहानपणीचे क्षण पुन्हा जगण्याची आणि काहीही झाले, तरी आपण नेहमी एकमेकांच्या पाठीशी असणार आहोत हे आश्वासन एकमेकांना देण्याचे हे पर्व आहे.”

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शि…