no images were found
पावसामुळे उद्याची नशामुक्त रन /वॉक 12 ऑक्टोबरला होणार
कोल्हापूर : नशामुक्त कोल्हापूर अभियान पंधरवडा साजरा करणे सुरु आहे. कोल्हापूर जिल्हयाला पावसाचा ऑरेज अलर्ट असून जिल्हयात सर्वत्र जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे उद्या दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी होणारा आयोजीत रन/ वॉक उपक्रम रद्द करुन रविवार, दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी, सकाळी 6 वाजता कोल्हापूर शहरातील पोलिस परेड ग्राऊंड येथे सदर रन/वॉक उपक्रम आयोजीत करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील नागरिकांना नशामुक्तीबाबत जागरुक करण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग आणि विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्त कोल्हापूर अभियान अंतर्गत 12 ऑक्टोबरला ‘रन अँड वॉक’ चे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण जिल्ह्यात एकाच दिवशी एकाच वेळी नशामुक्त कोल्हापूरसाठी रन अँड वॉक मधून सहभागी होत हजारो नागरिक नशाविरोधी संदेश देणार आहेत.